Brinjal Side Effects : वांगी ही अशी फळभाजी आहे जी सगळ्यांना खायला आवडते. भरली वांगी, मसाला वांगी, फ्राय वांगी, एवढच काय डाळ वांग्याचं कालवण ही गरम-गरम भातासोबत ताव मारणारे खवय्ये काही कमी नाहीत. अगदी हाताच्या बोटावर मोजणारे लोक असतील ज्यांना वांगी खायला आवडत नसेल. हिरवट पांढरी, जांभळट रंगाची वांगी बाजारात नेहमीच उपलब्ध असतात. वांगी खाण्याचे फायदे आपण अनेकवेळा ऐकले असतील किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून माहिती घेतली असतील. मात्र, त्याचे काही तोटे ही आहेत. आज आपण कोणत्या लोकांनी वांगी खाऊ नयेत याविषयी जाणून घेणार आहोत.
किडनी स्टोनचा धोका
ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे. त्यांनी वांगी खाऊ नयेत.वांग्याच्या बिया अतिरिक्त स्टोन बनवण्याचे काम करू शकतात.यामुळे किडनीचे नुकसान होऊ शकते.
हाडांसाठी चांगले नाही
वांग्यात ऑक्सलेट हे तत्व आढळते. त्यामुळे कॅल्शियमचे शोषण कमी होते. हाडांच्या आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते.ज्या लोकांची हाडे कमकुवत आहेत.त्यांनी वांगी खाणे टाळावे.
मूळव्याध रुग्णाने देखील खाणे टाळावे
जर तुम्हाला अशक्तपणा असेल आणि मूळव्याध नसल्याचा त्रास होत असेल तर वांगी खाऊ नयेत. यामुळे समस्या आणखी वाढू शकते.
सांधेदुखीच्या रुग्णांनीही वांगी खाऊ नयेत
सांधेदुखीचा त्रास असला तरी वांगी खाऊ नयेत. त्यामुळे सांधेदुखीची समस्या अधिक गंभीर होऊ शकते.
या समस्या देखील होऊ शकतात
जास्त वांगी खाणे देखील हानिकारक असू शकते. त्यामुळे पोटदुखी, उलट्या, डोकेदुखी, खाज सुटणे अशा तक्रारी दिसून येतात.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.
Related Posts
Add A Comment