भाजपा हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यांनी प्रेमाने लढाई जिंकली.आम्ही आमची पातळी सोडली नाही. टपरीवाले, रिक्षावाले म्हणून आम्हाला हिणवले. पण आता मोदी-शहांचे पाठबळ मिळाले आहे. आता केंद्राच्या मदतीने राज्याला प्रगतीकडे घेवून जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी विधानसभेत भाषणावेळी राज्याच्या विकासासाठी मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये इंधनावरील व्हॅट कमी करुन शेतकरी आत्महत्यामुक्त करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच रायगडमधील हिरकणी गावाला २१ कोटीचा निधी जाहीर केला.
यावेळी ते बोलताना म्हणाले, सत्तेत पद असताना जर काम नाही करणार तर कधी करणार. महाराष्ट्रातील जे शिवसैनिक पदावर काम करतात ते सर्व युती सरकारच्य़ा मदतीने अमुलाग्र बदल घडवून आणतील. राज्याच्या विकासाचा संकल्प आम्ही हाती घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सुखी-समाधनी ठेवण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करुया. यासाठी विरोधी पक्षांनी देखील आम्हाला मदत करावी अशी विनंती त्यांनी केली. हे सरकार सर्वसामान्यांच आहे. सत्ताधारी आणि विरोधक मिळून हातात हात घेऊन काम करुया असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्रीपदी येताच केली मोठी घोषणा
१) इंधनावरील व्हॅट कमी होणार.
२) शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करणार.
३)रायगडमधील हिरकणी गावाला २१ कोटीचा निधी जाहीर.
Previous Articleमहाराष्ट्रात पुन्हा एकदा रामायण, महाभारताची पुनरावृत्ती होणार
Next Article पुन्हा दरड कोसळण्याची संभावना
Related Posts
Add A Comment