वृत्तसंस्था/ पुदुच्चेरी
भाजप-राओला सरकारच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा प्रचार सुरू केला असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील विविध पक्षांच्या नेत्यांना भेटण्यास प्रारंभ केला आहे. शनिवारी त्यांनी येथे रालोआच्या आमदारांसमोर भाषण केले. यंदा पुदुच्चेरीत प्रथमच भाजपला सत्तेत सहभाग मिळाला आहे. मुर्मू यांनी एआयएडीएमके नेत्यांचीही भेट घेतली असून पाठिंब्याची मागणी केली आहे.
पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, पुदुच्चेरीचे गृहमंत्री ए. नरसिंहवय्यम तसेच सत्ताधारी आघाडीचे आमदार यांच्याशी मुर्मू यांनी बातचीत केली. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्यसभा सदस्य एस. सेल्वगणपती यांच्याकडेही त्यांनी पाठिंब्याची मागणी केली. पुदुच्चेरी विधानसभेत 30 आमदार आहेत.