तालुक्यात शिवजयंतीचा उत्साह द्विगुणीत : भगवे ध्वज, भगव्या पताका, रांगोळय़ा घालून रस्ते सुशोभित : तरुण-तरुणींसह बालगोपाळ, ज्येष्ठ नागरिकांमध्येही उत्साहाचे भरते
प्रतिनिधी /बेळगाव
सोमवारी तालुक्यात शिवजयंतीचा उत्सव मोठय़ा उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. खेडोपाडी शिवजयंती मंडळांनी याची तयारी काही दिवसांपासून आरंभली होती.
कंग्राळी बुद्रुक परिसर
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषात कंग्राळी बुद्रुक, शाहूनगर, गौंडवाड, यमनापूर परिसरामध्ये शिवजयंती मोठय़ा उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ
येथील शिवप्रेमी युवक मंडळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व ग्रामस्थवतीने गावच्या चौकामध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते मल्लाप्पा पाटील व हभप महादेव पाटील यांच्या हस्ते अश्वारुढ शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. ग्रा.पं. उपाध्यक्ष अनिल पावशे, सदस्य दत्ता पाटील, प्रदीप पाटील, दादासाहेब भदरगडे, नवनाथ पुजारी आदींच्या हस्ते मूर्तीचे पूजन करण्यात आले. ज्योतीचे पूजन ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीफळ ग्रा. पं. सदस्य नवनाथ पुजारी यांनी वाढविले. ध्वजपूजन पत्रकार सदानंद चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते बाळू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. हनुमान भजनी मंडळाच्या भक्तिगीतांनी सर्वांना आकर्षित केले.
योगेश पवार यांची शिवभक्ती
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी शिवभक्त योगेश पवार यांनी छत्रपतींच्या पराक्रमाचा परिचय श्लोकांमधून करवून वाहवा मिळविली. सुवासिनींनी पाळणागीत गायिले. प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. सामाजिक कार्यकर्ते मयूर बसरीकट्टी, निरंजन जाधव, शंकर पाटीलसह शिवप्रेमी युवक मंडळ, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवशाही युवक मंडळ
नेताजी गल्ली येथील शिवशाही युवक मंडळवतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. ग्रा. पं. उपाध्यक्ष अनिल पावशे यांनी मूर्तीपूजन केले. माजी सदस्य कल्लाप्पा जाधव यांनी श्रीफळ वाढविले. ज्ये÷ नागरिक नागेश हुद्दार व मराठी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष मोहन भैरटकर यांच्या हस्ते पाळणा पूजन करण्यात आले. कलमेश्वर सोसायटी उपाध्यक्ष सुभाष हुद्दार, इंजि. सोमनाथ हुद्दार, जवान संतोष चव्हाण यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. शिवभक्त प्रवीण चव्हाण याने महाराजांच्या पराक्रमी जीवनाचे वर्णन श्लोकांमधून केले. यावेळी शिवशाही युवक मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
राजषी शाहू डेअरी
राजषी शाहू डेअरीच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. ऍड. सुधीर चव्हाण यांच्या हस्ते मूर्तीपूजन करण्यात आले. अध्यक्ष वाय.बी. चव्हाण व संस्थापक शंकर चव्हाण, संचालक किसन हुरुडे आदींनी दीपप्रज्वलन केले. संचालक सुभाष चिखलकर यांने शिवाजी महाराज फोटोपूजन तर शिक्षक वाय. एम. पाटील व यल्लाप्पा हर्जे यांनी राजर्षी शाहू महाराज फोटोपूजन केले. शाहीर नारायण कुलकर्णी यांनी लक्ष्मी फोटोपूजन केले. सुवासिनींनी पाळणा म्हटला. यावेळी डेअरीचे संचालक, भागधारक व शेतकरी उपस्थित होते.
बाल तरुण युवक मंडळ
बाहेर गल्लीतील बाल तरुण युवक मंडळ, मोरया ग्रुप व ग्रामस्थांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.दीपप्रज्वलन ग्रा. पं. सदस्य दत्ता पाटील यांच्या हस्ते, मूर्तीपूजन सदस्य यल्लोजी पाटील यांच्या हस्ते, श्रीफळ गणपत निलजकर यांनी वाढविले. सुवासिनींनी पाळणा म्हटला. यावेळी मोरया ग्रुपचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवशक्ती युवक मंडळ
शिवशक्ती युवक मंडळ गणेश चौक येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. ज्ये÷ नागरिक व तरुण कार्यकर्त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अनिल हुवाण्णाचे व संग्राम राणे यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले. सुवासिनींच्या हस्ते पाळणा पूजन करण्यात आले. ग्रा. पं. सदस्य दादासाहेब भदरगडे यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी किरण तरळे, अनिल कडोलकर, विजय हुवाण्णाचे, प्रदीप कडोलकर, गणपत यळ्ळूरकर आदी उपस्थित होते.
ग्रा. पं. कार्यालय
येथील ग्रा.पं.मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षा संध्या चौगुले व उपाध्यक्ष अनिल पावशे यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आले. सदस्य नवनाथ पुजारी यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी ग्रा. पं. पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मजगाव
मजगाव येथील गणेश युवक मंडळाच्यावतीने गणपत गल्ली येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. दीपक सातगौडा यांच्या हस्ते शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. राजहंसगड येथून शिवज्योत आणण्यात आली. याप्रसंगी संदीप नरसगौडा, महादेव मजुकर, मल्लाप्पा मासेकर, सचिन बांदेकर, अप्पय्या काकतकर व नागरिक उपस्थित होते. ज्ये÷ मंडळींचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. फटाक्मयांची आतषबाजी करण्यात आली. सुवासिनींनी पाळणा म्हटला. गावात शिवमय वातावरण होते. लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली, तानाजी गल्ली, गजानननगर, कलमेश्वरनगर, राजारामनगर, देवेंद्रनगर आदी उपनगरांमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. कलमेश्वरनगर येथे सोमवारी रात्री महाप्रसादाचे आयोजन केले होते.
राजहंसगड

राजहंसगड येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. राजहंसगडावरील सिद्धेश्वर देवाचे पूजन करून प्रेरणामंत्र म्हणून शिवज्योत आणण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी शुभम हावळ, कृष्णा लोखंडे, प्रशांत नावगेकर, मारुती लोखंडे, नागराज नावगेकर, सुखेश निर्डेकर, परशराम कुंडेकर, कृष्णा गडकरी, मकरंद लोखंडे आदी कार्यकर्ते व गावकरी उपस्थित
होते.
बसवन कुडची

बसवण कुडची येथील तानाजी गल्लीत शिवजयंती साजरी करण्यात आली. गल्लीतील महिलांनी पाळणा गायिला. हार घालून व श्रीफळ वाढवून मूर्तीची पूजा करण्यात आली. यावेळी भारता मायाणाचे, वैशाली रवळूचे, रूपा चौगुले, देवाक्का एकणेकर, जान्हवी रवळूचे, इंदुमती रवळूचे, श्रुती चौगुले, माया मुद्दी व गल्लीतील महिला उपस्थित होत्या.
सांबरा

येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बसगौडा पाटील आणि सागर जोगाणी यांनी शिवमूर्तीचे पूजन केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शिवसेना फलकाचे पूजन पुंडलिक जत्राटी व नितीन देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन व चौथरा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी चौक परिसरात शंकर यड्डी व भुजंग जोई यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिवभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.
नंदिहळ्ळी

नंदिहळ्ळी येथील शिवज्योत युवक मंडळाच्यावतीने परंपरेनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. ग्रा. पं. अध्यक्षा निंगव्वा कुरबर व उपाध्यक्ष नारायण पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाले. आरती करण्यात येऊन ध्येयमंत्राने सांगता झाली. याप्रसंगी ग्रा. पं. सदस्य सहदेव बेळगावकर, रामदास जाधव, मल्लिकार्जुन लोकुर, चेतन पाटील, नामदेव येळगुडकर, मनोहर जाधव, राजेंद्र मादाकाचे आदी उपस्थित होते.
धामणे

येथे शिवशक्ती युवक मंडळाच्यावतीने बसवाण्णा मंदिर आवारात शिवमूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. प्रेरणामंत्र म्हणून आरतीनंतर ध्येयमंत्राने सांगता झाली. मंडळाचे अध्यक्ष बाळू केरवाडकर, पिंटू मादाकाचे, नागराज मादाकाचे, जोतिबा केरवाडकर,शिवाजी पाटील, बंडू पाटील, बाहुबली पुजारी आदी उपस्थित होते. धामणे विभाग शिवप्रतिष्ठानवतीने कलमेश्वर मंदिर शेजारील अश्वारुढ शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्रीपती पाटील, सुमित जायाण्णाचे, किशोर बेळगावकर, शुभम धर्मूचे, ज्ञानेश्वर भोसले आदी उपस्थित होते. बलभीम तरुण मंडळवतीने शिवमूर्तीचे पूजन बाळू बाळेकुंद्री यांनी केले. ग्रा. पं. माजी सदस्य विजय बाळेकुंद्री यांनी श्रीफळ वाढविले. याप्रसंगी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. नवक्रांती युवक मंडळ, जय भवानी युवक मंडळ, नवभारत युवक मंडळ, धामणे कार्यक्षेत्रातील ब्रह्मलिंगहट्टी येथे धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान व ब्रह्मलिंग युवक मंडळ, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील मंडळांच्यावतीने शिवजयंती उत्साहाने साजरी होत आहे.
यमनापूर

येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज युवक मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ले राजहंसगडावरून शिवभक्तांनी आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत करण्यात आले. गावभर शिवज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. सुवासिनी आरती ओवाळून स्वागत करत होत्या. शिवजयंती कार्यक्रम ठिकाणी शिवज्योत तेवत ठेवण्यात आली.शिवज्योत आणण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते विशाल संभाजीचे, संदीप संभाजीचे, विनायक दाडे, नारायण कणबरकर, प्रज्योत निलजकर, कार्तिक पाटील, कुलदीप पाटील, सुशांत पाटील, संतोष पाटील, चेतन पाटील आदी शिवभक्तांनी परिश्रम घेतले.गावचे ज्ये÷ नागरिक खाचू पाटील, शंकर कोनेवाडी यांच्या हस्ते मूर्तीपूजन करण्यात आले. परशराम पाटील यांनी श्रीफळ वाढविले. सुवासिनींनी पाळणागीत गाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज युवक मंडळाचे कार्यकर्ते, शिवप्रेमी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अलतगा

येथील विविध युवक मंडळे, देवस्थान पंच कमिटी व ग्रामस्थांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
प्रारंभी ग्रा.पं. सदस्य चेतक कांबळे यांनी स्वागत केले. गणेशमूर्ती पूजन आप्पा पावशे यांच्या हस्ते, अश्वारुढ शिवमूर्तीचे पूजन चंद्रकांत धुडूम यांच्या हस्ते, फलक पूजन देवस्थान पंच कमिटी सदस्य परशराम चिखलकर यांच्या हस्ते करण्यात आले. सदस्य नारायण पावशे यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. सुवासिनींनी पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला. यावेळी महिला भगिनी, बालचमू व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
बसवन कुडची मेन रोड

बसवन कुडची येथे मेन रोडवरील श्री कलमेश्वर युवक मंडळवतीने शिवजयंती साजरी केली. नगरसेवक बसवराज मोदगेकर यांनी शिवमूर्तीचे पूजन करून श्रीफळ वाढविले. सर्वांना सुंठवडा वाटण्यात आला. यावेळी परशराम बेडका, यल्लाप्पा मुचंडीकर, सुरेश मुतकेकर, आकाश हिंडलगेकर, तुकाराम पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
किणये परिसरात शिवजयंती जल्लोषात

येथे शिवजयंती मोठय़ा उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. सोमवारी पहाटेच गावागावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळय़ाची तयारी सुरू होती. बहुतांश गावांमध्ये सकाळी सातच्या दरम्यान शिवजयंती सोहळा झाला. यानिमित्त भगव्या पताका, भगवे ध्वज लावले होते. कार्यकर्त्यांनी भगवे फेटे परिधान केले होते. यामुळे तालुका भगवेमय बनला होता.
सकाळी गावागावांमध्ये ढोल-ताशा आदी वाद्यांचा गजर सुरू झाला अन् ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.गेली दोन वर्षे शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. यंदा मात्र शिवजयंती दिमाखात साजरी करताना शिवभक्त दिसून आले. तालुक्मयाच्या बहुतांशी गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ किंवा सिंहासनारुढ मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महिला पाळणा म्हणत होत्या. या सोहळय़ानिमित्त तरुण-तरुणींमध्ये उत्साह दिसून आला.
शिवजयंतीनिमित्त गावांमध्ये पोवाडय़ाचे कार्यक्रम आयोजित केले होते. काही ठिकाणी भजन, प्रवचन व कीर्तन निरुपण कार्यक्रम झाले.
कंग्राळी खुर्दमध्ये शिवजयंती उत्साहात

कंग्राळी खुर्द येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान शाखा, महात्मा फुले मंडळ व विविध ठिकाणी ग्रामस्थांच्यावतीने शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी गावच्या वेशीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीचे पूजन ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, शिवप्रति÷ान हिंदुस्थान शाखा कंग्राळी खुर्दचे कार्याध्यक्ष आर. आय. पाटील, ऍड. एम. जी. पाटील, अनंत निलजकर आदींनी पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून केले.
माजी सैनिक संघटना पदाधिकाऱयांनी श्री शिवप्रतिष्ठान फलकाचे पूजन केले. उपस्थित महिला भगिनींनी पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला. त्यानंतर शिवप्रतिष्ठानच्या धारकऱयांनी श्लोक, ध्येयमंत्र, आरती म्हणून शिवरायांचा जयजयकार केला.
एक वेगळा आदर्श
शिवजयंती कार्यक्रमप्रसंगी श्रीनाथ पाटील यांनी आपल्या लग्नाचे औचित्य साधून तर विशाल बाळेकुंद्री याने आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगडावरील सुवर्ण सिंहासनासाठी निधी मदतरुपाने जमा केला. यामुळे उपस्थितांतून त्यांचे कौतुक करण्यात आले व इतरांनीही हा आदर्श घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, ग्रा. पं. माजी अध्यक्षा रुक्मिणी निलजकर, पैलवान कल्लाप्पा पाटील, जवान प्रमोद चव्हाण, अनिल बाळेकुंद्री, जोतिबा पाटील, बाळू बसरीकट्टींसह शिवप्रति÷ान हिंदुस्थानचे कार्यकर्ते, शिवप्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन पाटील यांनी
केले.
एकता जनसेवा संघ
रामनगर एकता जनसेवा संघाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात अप्पाराव पाटील, संभाजी पाटील, भाऊ पाटील, तुकाराम कांबळे यांनी मूर्तीपूजन केले. शिवभक्त विनायक पाटील यांनी श्लोक, ध्येयमंत्र व आरती गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले. सुवासिनींनी पाळणा गाऊन जन्मोत्सव साजरा केला.
याचबरोबर वरसिद्धी विनायक मंदिर चौक, नारायण गल्ली, शिवाजी गल्ली, पाटील गल्ली, संभाजी गल्ली या ठिकाणच्या मंडळांनी पदाधिकाऱयांच्या हस्ते मूर्तीपूजन, आरती व पाळणे गाऊन शिवजयंती मोठय़ा उत्साहात साजरी केली. वरील सर्व ठिकाणी शिवप्रेमी नागरिक, तरुण कार्यकर्ते व महिलावर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
उचगाव येथे शिवजयंती

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सोमवारी शिवजयंती उत्सवाचा जल्लोषात प्रारंभ झाला. ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी उचगाव दुमदुमून गेले. सकाळी 7 वा. मुले धारकऱयांचा वेश परिधान करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीसमोर जमा झाले. शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवाजी महाराज जयंती उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले. प्रारंभी पारगडवरून शिवज्योत आणण्यात आली आणि शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. यावेळी गावातील महिलांनी शिव पाळणा म्हणून शिवजन्मोत्सव साजरा केला.
बाळेकुंद्री खुर्दमध्ये अश्वारुढ शिवमूर्तीची भव्य मिरवणूक

बाळेकुंद्री खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बसविण्यात येणाऱया अश्वारुढ शिवमूर्तीची सोमवारी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
प्रारंभी सुवासिनींनी पाळणागीत सादर केले. यावेळी सर्वांना सुंठवडा वाटण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक नामफलकाचे उद्घाटन माजी आमदार संजय पाटील, सीपीआय महांतेश बसापुरे, उमेश पुरी, सागर जोगाणीसह ग्रा. पं. सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. कमिटीच्यावतीने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर भव्य मिरवणुकीला चालना देण्यात आली.
मिरवणुकीमध्ये झांजपथक, धनगरी वाद्य व भजनी मंडळ, सजवलेल्या बैलजोडय़ा होत्या. त्यापाठोपाठ वाहनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ शिवमूर्ती होती. मिरवणूक पाहण्यासाठी शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. मिरवणूक मार्ग गर्दीने फुलून गेला होता. ठिकठिकाणी आरती ओवाळून मिरवणुकीचे स्वागत करण्यात येत होते. मिरवणूक मार्गावर भगवे ध्वज, भगव्या कमानी व पताका लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे अवघे गाव भगवेमय झाले होते.
मिरवणुकीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर संभाजी महाराज की जय’, ‘भारत माता की जय’, ‘हिंदू धर्म की जय’ आदी घोषणा देण्यात येत होत्या. मिरवणुकीमध्ये तरुण मुले-मुली, महिला व पुरुष पारंपरिक वस्त्रs घालून सहभागी झाले होते. भगवेमय वातावरणात निघालेली मिरवणूक सर्वांच्या डोळय़ांचे पारणे फेडत होती.
मिरवणूक मेन रोड, पेठ गल्लीमार्गे लक्ष्मी गल्ली, पाटील गल्ली, जाधव गल्ली, शिवाजी गल्ली, कलमेश्वर गल्लीमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचली. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती.
ग्रामस्थ व शिवभक्तांच्या उदार देणगीतून 14 फूट उंचीची छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक शिवमूर्ती गावात प्रथमच बसविण्यात आली आहे. त्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण आहे. संतिबस्तवाड येथील मूर्तीकार गुरुसिद्धन्नवर यांनी ही आकर्षक मूर्ती बनविली आहे. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी युवराज जाधव, शिवराज जाधव, संजय पाटील, श्याम कन्नेकर, राजदीप जाधव, विश्वनाथ जाधव, गजानन पाटील, शांत चंदगडकरसह शिवपुतळा कमिटीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मंगळवार दि. 3 रोजी चौथऱयावर मूर्तीची प्रति÷ापना करण्यात येणार आहे.