मोबाइल ऍप्लीकेशनचा होणार लाभ : उभयतात झाला करार
वृत्तसंस्था/ मुंबई
आपल्या इलेक्ट्रिक दुचाकी व्यवसायाच्या विस्तारासाठी हिरो इलेक्ट्रिकने जिओ-बीपी यांच्याशी भागीदारीचा निर्णय पक्का केला आहे. इलेक्ट्रिक दुचाकी घेण्यासाठी प्रोत्साहन मिळावे तसेच बॅटरी स्वॅपिंग पायाभूत सुविधा उभारण्यासाठी दोन्ही कंपन्या येत्या काळात प्रयत्न करणार आहेत. यासंदर्भात उभय कंपन्यांमध्ये एक करारही करण्यात आला आहे.

हिरो इलेक्ट्रिकला त्यांच्या वाहनचालकांना जिओ-बीपी चार्जिंग व स्वॅपिंग सेवेचा लाभ घेता येणार आहे. जियो-बीपी देशभरात वाहन चार्जिंगकरिता चार्जिंग केंदे उभारण्याच्या कार्यात मग्न आहे. मोबाईल ऍप्लिकेशनच्या माध्यमातून दोन्ही कंपन्यांकडून आपल्या वाहनचालकांचे चार्जिंगसंबंधी सर्वतोपरी समाधान करण्यासाठी प्रयत्न असणार आहेत. ग्राहकांना न थांबता यांच्या सेवचा लाभ भविष्यात घेता येणार आहे. जागतिक स्तरावरील अनुभवाचा लाभ उठवत दोन्ही कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांना बाजारात उतरवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
चार्जिंग केंद्रांची माहिती
जिओ-बीपी पल्स ऍप्लिकेशनमुळे ग्राहकांना जवळपासच्या चार्जिंग केंद्रांची माहिती मिळू शकणार आहे. त्यांना जवळच्या केंद्रावर वाहन चार्जिंगला देणे सोयीस्कर होईल.