चेन्नई : दक्षिण कोरियन कार निर्माती कंपनी ह्युंडाई तामिळनाडूमध्ये जवळपास 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्dयाची माहिती आहे. सदरची गुंतवणूक ही पुढील 10 वर्षांसाठी असणार असून याबाबत तामिळनाडू सरकारसोबत ह्युंडाई कंपनीने सहकार्याचा करार (एमओयू) केला आहे. इलेक्ट्रिक वाहन बॅटरी जोडणी संदर्भातील कारखान्याकरिता ही गुंतवणूक असणार असून वार्षिक 1 लाख 78 हजार बॅटरी उत्पादन घेतले जाणार आहे, अशी माहिती आहे. या नव्या गुंतवणुकीच्या माध्यमातून आगामी काळात 500 जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला भारतामध्ये सहकार्य करण्यासाठी व रोजगार वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ उन्सु किम यांनी म्हटले आहे.
Previous Articleमहागाईविरुद्धचे युद्ध संपलेले नाही!
Next Article मान्सून अंदमानात रेंगाळला
Related Posts
Add A Comment