अनिल बेनके चषक अखिल भारतीय टेनिसबॉल स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
अनिल बेनके स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित पाचवी अनिल बेनके अखिल भारतीय निमंत्रितांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात इंडियन बॉईज, आर्मी इलेव्हन, चॉईस इलेव्हन, यमकनमर्डी व श्री स्पोर्ट्स खडक गल्ली संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन पुढील फेरीत प्रवेश मिळविला. राहुल नाईक, केतन जैस्वाल, वासिम अक्रम, रवी पिल्ले यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सरदार्स मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात लकी स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 गडी बाद 108 धावा केल्या. त्यात भरत गाडेकरने 5 षटकार 4 चौकारांसह 69 धावा केल्या. इंडियन बॉईजतर्फे नासिर, तनवीर, माजीद व हेमराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंडियन बॉईजने 9.4 षटकात 5 गडी बाद 110 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात राहुल नाईक व राहुल शिंदे यांनी प्रत्येकी 33 धावा केल्या.
दुसऱ्या सामन्यात नंदगड ग्रामीण संघाने प्रथम फलंदाजी करताना 9.1 षटकात सर्व गडी बाद 58 धावा केल्या. त्यात अशोक व प्रविण यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. आर्मीतर्फे केतन जैस्वालने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आर्मी संघाने 6.2 षटकात 4 गडी बाद 59 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. विक्रम जगदाळेने 26 धावा केल्या. नंदगडतर्फे अरविंदने 3 गडी बाद केले.
तिसऱ्या सामन्यात राजस्थान युवक मंडळने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 4 गडी बाद 100 धावा केल्या. त्यात संजय पुरोहितने 38 तर सुनील ढवळेने 25 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना यमकनमर्डी संघाने 9.3 षटकात 6 गडी बाद 106 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. वासिम अक्रमने 38 तर शामीने 32 धावा केल्या.
चौथ्या सामन्यात वीसीसी बेळगाव संघाने 10 षटकात 8 गडी बाद 83 धावा केल्या. बेंजामिन कुंदलने 26 धावा केल्या. खडक गल्लीतर्फे रवी पिल्लेने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्री स्पोर्ट्स खडक गल्लीने 7.3 षटकात 4 गडी बाद 84 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात प्रकाश जाधवने 28 तर कदमने 24 धावा केल्या.
सोमवारचे सामने-1) बेळगाव वॉरियर्स वि. एससीव्ही बेळगाव सकाळी 9 वा. 2) चॉईस यमकनमर्डी वि. एसआरएस हिंदुस्थान स. 11 वा. 3) कॉलेज बॉईज खानापूर वि. एसएसएस फौंडेशन कणबर्गी दु. 1 वा. 4) पहिल्या सामन्यातील विजेत्या वि. दुसऱ्या सामन्यातील विजेता दु. 3 वा.