जांबोटी – गेल्या 66 वर्षापासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न लढा आता सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात असून आपण सर्वांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या भगव्या झेंडय़ाखाली एकत्र येऊन आगामी विधानसभेची निवडणूक जिंकण्यासाठी व मराठी भाषिकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीकडे इच्छुकांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करावेत, या संदर्भात जनजागृती करण्यासाठी मंगळवारी जांबोटी येथे जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती फेरीमध्ये खानापूर तालुका म. ए. समितीचे सर्व पदाधिकारी व समितीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सामील झाले होते.
