प्रतिनिधी /बेळगाव
श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज बेळगाव, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी समाज महिला मंडळ यांच्यातर्फे वैश्यवाणी समाजातील सातवी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच एलकेजी ते पीयुसीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वहय़ा वितरण करण्यात आल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जीएसएस पदवीपूर्व कॉलेजचे प्राचार्य प्रणव पित्रे उपस्थित होते. व्यासपीठावर दत्ता कणबर्गी, अमित कुडतुरकर, मोहन नाकाडी, रवी कलघटगी, शाम गावडे, मोतीचंद दोरकाडी, विद्या मुरकुंबी, उज्ज्वला बैलूर, लक्ष्मी बिडीकर उपस्थित होत्या.
प्रणव पित्रे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुसमोर नतमस्तक रहावे, विज्ञानाबराब्sारच मूल्यांची जोपासनाही महत्त्वाची आहे, असे सांगून करिअरबद्दल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रसाद निखारगे यांनी केले. अमित कुडतरकर यांनी आभार मानले. याप्रसंगी समाजाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.