अभिनव शर्मा मालिकावीर, श्रेयस बोकडे सामनावीर

प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट अकादमी आयोजित पर्सिस्टंट चषक 13 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नीना स्पोर्ट्स संघाने आनंद अकादमीचा 28 धावांनी पराभव करून पर्सिस्टंट चषक पटकाविला. अभिनव शर्माला मालिकावीर तर श्रेयस बोकडेला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
भुतरामहट्टी येथील महावीर जैन महाविद्यालयाच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात नीना स्पोर्ट्स संघाने 20 षटकात 4 बाद 160 धावा केल्या. श्रेयसने 59, समर्थ चौगुलेने 50, अभिनवने 28 धावा केल्या. आनंदतर्फे अथर्व करडीने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमी संघाने 20 षटकात 8 बाद 132 धावाच केल्या. समर्थ करडीने 50 धावा केल्या. नीनातर्फे झियान सलीमवाले व अभिनव शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे इम्रान अली सय्यद, वीरेश गौडर, समिर सलीमवाले, ईश्वर इटगी यांच्या हस्ते नीना स्पोर्ट्स संघाला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. समर्थ चौगुलेला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज झियान सलीमवाले, इम्पॅक्ट खेळाडू श्रेयस बोकडे व मालिकावीर अभिनव शर्मा यांना चषक देवून गौरविण्यात आले.