गौड ब्राह्मण सभेचे पुरस्कार : जीवन गौरव’ अऊण दाभोलकर यांना
प्रतिनिधी /सिंधुदुर्ग
गौड ब्राह्मण सभा या ज्ञाती संस्थेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींसाठी नुकतीच पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये तऊण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांना ‘रावबहाद्दूर बांबार्डेकर पुरस्कार, तर सुप्रसिद्ध चित्रकार अऊण दाभोलकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. आणखी सहा पुरस्कारांची घोषणाही याचवेळी करण्यात आली.
गौड ब्राह्मण सभा ही संस्था यावर्षी शतकोत्तर रौप्यमहोत्सवाची सांगता करीत आहे. यानिमित्त 25 डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता प्रा. वैद्य सभागृह, दादर येथे विशेष स्नेहसंमेलनाचे आयोजन केले आहे. या प्रसंगी गौड ब्राह्मण ज्ञातीतील महनीय व्यक्तींनी बजावलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांमध्ये किरण ठाकुर आणि अऊण दाभोलकर यांच्यासह पुणे येथील राजन पाटकर यांना ‘बा. नी. देसाई आदर्श समाजसेवक पुरस्कार’, ज्येष्ठ समाजसेवक सुभाष वाघ यांना ‘डी. पी. नाईक आदर्श समाजसेवक पुरस्कार’, बेंगळूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयप्रकाश नायक यांना ‘सूर्याजी कोचरेकर आदर्श समाजसेवक पुरस्कार’, निवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रभाकर सामंत यांना ‘विशेष कर्तृत्व पुरस्कार’, अॅड. संग्राम देसाई यांना ‘विशेष कर्तृत्व पुरस्कार’ व प्रसिद्ध वास्तूविशारद शशी प्रभू यांना ‘विशेष जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे.
दादर येथे पार पडणाऱ्या या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकुर असणार आहेत. विशेष अतिथी म्हणून उद्योगमंत्री उदय सामंत यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व तऊण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, सुप्रसिद्ध वास्तूविशारद शशी प्रभू, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र-गोव्याचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. संग्राम देसाई यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
याप्रसंगी संगीत कार्यक्रम होणार आहे. सुप्रसिद्ध शास्त्राrय गायक नचिकेत देसाई, केतकी भावे-जोशी व प्रसन्ना प्रभूतेंडोलकर यांचे गायन होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष उमाकांत महाजन आणि कोषाध्यक्ष मनिष दाभोलकर यांनी दिली.