Sachin Tendulkar Makar Sankranti VIDEO : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज तिळाचा लाडू बनवत मकर सक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिळगुळ बनवण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे असे कॅप्शन देत त्याने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. सचिन तेंडुलकरने याआधीही व्हेजिटेबल गार्डन, चुलीवर जेवण करणाऱ्या महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आज त्याने चक्क तिळाचे लाडू बनवून घरच्यांना सरप्राईज दिलं आहे. तसंच आपल्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
व्हिडिओत नेमके म्हटलं आहे.
‘मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा! मी आज तिळगूळ करणार आहे. मात्र हे सरप्राईज आहे.घरच्यांना याबाबत काही माहिती नाही.’सचिनने यानंतर व्हिडिओत तिळगूळ करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.त्यानंतर तो म्हणाला की,’तिळगूळ तर करून झालेत मात्र हे असं आहे की परीक्षेचे पेपर लिहिले आहेत मात्र रिझल्टची वाट पोहतोय.यानंतर सचिनने एक तिळाचा लाडू उचलून खात तिळगूळ घ्या गोड बोला म्हणत मकर सक्रांतीच्या शुभेच्छा आपल्या चाहत्यांना दिल्या आहेत.
Related Posts
Add A Comment