वृत्तसंस्था/ पुणे
येथे सुरू असलेल्या 84 व्या वरि÷ांच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा माजी विश्व चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या बी. साई प्रणितने पुरुष एकेरीत विजयी सलामी देताना पृथ्वी रॉयचा पराभव केला.
साई प्रणितने पहिल्या फेरीतील सामन्यात रॉयचा 21-13, 21-19 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडला. महाराष्ट्राच्या दहाव्या मानांकित हर्षल दाणीने किरणकुमारवर 16-21, 21-17, 21-12 अशा गेम्समध्ये मात करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. आर्या भिवपतकीने रिकू खापेचा 24-22, 21-11 असा पराभव करत विजयी सलामी दिली. महिलांच्या एकेरीमध्ये अस्मिताने गौरीकृष्णाचा 21-9, 21-12, प्रेरणा अळवेकरने पेंकी कर्कीचा 21-6, 20-22, 21-14, मालविका बनसोडने जेनिकाचा 21-16, 21-11 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.