Burnning Container : सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटात रविवारी दुपारी कंटेनरचा बर्निग थरार पाहायला मिळाला. पुण्याहून साताऱ्याकडे येणाऱ्या कंटेनरच्या डिझेल टाकीला दुसरा ट्रक घासल्याने आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचले. अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहचला आणि पेटलेला कंटेनरची आग आटोक्यात आणण्याचे काम करण्यात आले. तसेच दुसरा ट्रक ही बाजूला घेण्यात आला.सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नसून याची नोंद पोलिसात झाली नव्हती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी दुपारी पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून कंटेनर साताऱ्याच्या बाजूकडे खंबाटकी घाटातून येत होता. मंदिराच्या जवळील वळणावर चढावर चढ चढत असताना पुढे मागे करत असताना डिझेल टाकीला घासले गेले. त्यामुळे अचानक टाकीने पेट घेतला. धुराचे लोट पाहून कंटेनर चालक भयभीत झाला. इतर वाहन चालकांनी गाड्या थांबवून पोलिसांना माहिती दिली. खंडाळा पोलीस, महामार्ग पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
Previous Articleसाहेबप्रेमी, बीआरडीएस अंतिम फेरीत
Next Article महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार
Related Posts
Add A Comment