बेळगाव : स्वीत्झर्लंडमध्ये यंदा पहिल्यांदाच शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. हिर्ष ट्रेड सेंटरच्या संस्थापिका प्रिया आपटे यांनी हा शिवजयंती कार्यक्रम आयोजित केला होता. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवार या संस्थेच्या सहकार्याने शिवजयंती साजरी झाली. लेझीम तसेच ढोल-ताशाच्या गजरात स्थानिक लोकांसोबत उत्सव साजरा करण्यात आला. भाग्यश्री जाधव, स्मिता शिर्के, प्राजक्ता पाटील, धनंजय पाटील, शेखर सालेम, ओमकार खंडोलकर, डॅनियल हुबर, कुमूद वेसणे यांनी तालबद्धरीत्या लेझीमची प्रात्यक्षिके सादर केली. प्रिया आपटे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. कल्याण येथील कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांच्या भाषणाचे व्हिडीओ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. संध्या कुलकर्णी, नेहा छत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. चारुदत्त दिवाण, अभिनव बाळकृष्ण यांनी आपल्या भाषणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडले. या कार्यक्रमात सहभागी कलाकारांना मानाचा फेटा, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी स्वीत्झर्लंडमधील शिवप्रेमी उपस्थित होते.
Previous Articleसामाजिक भान बाळगल्यास परिवर्तन शक्य
Next Article तरुण भारत सौहार्द सोसायटीचे आकर्षक व्याजदर
Related Posts
Add A Comment