अर्चना बनगे, प्रतिनिधी
Skin Care Tips : अनेकांना चेहऱ्यावरील पिंपल्स, वांग, स्पाॅट, सुरकुत्या आणि डोळ्याखाली काळेपणा येण्याची समस्या असते. अनेक महागडे प्रोडक्ट वापरले तरी याचा फायदा होत नाही. अशावेळी घरगुती उपायांचा तुम्हाला नक्कीच फायदा होवू शकतो. यासाठी सातत्य महत्त्वाचे असते. आज तुम्हाला घरगुती अशा काही टिप्स देणार आहोत ज्याचा तुम्हाला वरील समस्येपासून सुटका होण्यास निश्चित मदत होईल.कोणत्या टिप्स चला जाणून घेऊया.
1)पिंपल फ्रि आणि तेलकट त्वचेसाठी
तुम्हाला जर चेहऱ्यावर डाग नको असतील आणि चेहरा तेलकट नको असेल तर नियमित एक मिनिट फेशवाॅस करा. यामुळे चेहऱ्यावरील पोर्स क्लिन होतील आणि चेहरा एकदम क्लिन दिसेल. यामुळे चेहरा तेलकट होणार नाही. तसेच पिंपल्स उटणार नाहीत. तुम्हाला जो फेशवाॅश सुट होईल तो वापरा.
2)तांदळाचा वापर करा.
तुमच्या चेहऱ्यावर जर रिंकल येत असेल तर तांदळाची पेज वापरा. या पेजमध्य़े अॅलोवेरा जेल वापरा.जर तुमचा चेहरा कोरडा असेल तर त्य़ात व्हिटामीन सी कॅप्सूल टाका. हे जेल रात्रीच्यावेळी नियमित चेहऱ्यावर लावल्यास याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगले होईल तसेच सुरकुत्या पडायला सुरुवात झाली असेल तर ते देखील कमी होईल.
3)डोळ्याखालील वर्तुळ कमी करा
तुमच्या डोळ्याखाली जर काळी वर्तुळ आली असतील तर तुम्ही ही ट्रिक्स नक्की करून बघा. यासाठी सुरुवातीला एक बटाटा खीसून घ्य़ा. त्यात अर्धा चमचा काॅफी पावडर घाला.याला छान मिक्स करा. आता काॅटन पॅड मधून कट करा. त्यात ते पॅड टाका. हे पॅड सगळे मिश्रण शोषून घेईल. यानंतर हे पॅड अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर डोळ्यांच्याखाली ठेवून द्या. याने डोळ्याखालील वर्तुळ कमी होण्यास मदत होईल.
4)बर्फाचा वापर करा
तुम्हाला तुमची स्किन एकदम यंगलुकिंग करायची असेल किंवा नेहमीच तरूण दिसाव असं वाटत असेल तर चेहऱ्यावर बर्फाचा वापर करा. एका साध्य़ा काॅटनमध्ये बर्फाचा तुकडा घ्या. तो चेहऱ्यावर हळूहळू डॅब करा. यामुळे चेहरा टाईट होईल आणि तुम्ही सुंदर दिसाल.
5)चेहऱ्याचा योगा
आहारा सोबत चेहऱ्याला व्यायामाची देखील गरज असते. कोलॅजन बुस्ट करण्यासाठी आणि ब्लड सर्क्युलेशन करण्यासाठी य़ा योगाचा फायदा होतो. यासाठी तुम्हाला दोन प्रकारचा योगा तुम्हाला सांगणार आहोत. जे कदाचित तुम्ही लहानपणापासून देखील करत असाल.
1) सुरुवातीला तोंडात हवा भरून घ्या. त्यानंतर ओठांवर प्रेस करा. हा व्यायाम किमान 10 वेळा करा. सुरवातीला 5 वेळा करा. त्यानंतर हळूहळू 10 पर्यंत जावा.स्किल ग्लो करायला सुरुवात करेल.
2)दुसऱ्या स्टेपमध्येदेखील तोंडात हवा भरून घ्य़ा. आता हळूहळू तोंडाला मारायला सुरुवात करा. तुम्ही अनेकांनी लहान असताना हा प्रयोग केला असेल.
6)वांगावर उपायवांग जावा म्हणून अनेक प्रयोग करूनही म्हणावा तसा आपल्याला त्याचा फायदा होत नाही. तुम्ही हा घरगुती उपाय करायला सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला याचा फायदा होईल. यासाठी एक टोमॅटो घ्या तो किसून त्यातील रस काढून घ्य़ा.त्यात चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा मध घाला. याला चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर काॅटन पॅड डिप करा. संपूर्ण चेहऱ्याला आणि गळ्याला लावा. किमान 15 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा त्यानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. आठवड्यातून किमान 3 वेळा हा प्रयोग करा.
Previous Articleजाणून घ्या सैंधव मिठाचे फायदे
Next Article सेट परीक्षा 26 मार्चला
Related Posts
Add A Comment