Solapur Grampanchyat Election Result 2022 : जिह्यातील 174 ग्रामपंचाययताच्या निवडणुकांचे निकाल सकाळी आठ वाजलेपासून जाहीर होत हेत. प्रत्येक तालुकास्तरावरील तहसीलदार कार्यालय स्तरावार हे निकाल स्पष्ट होत आहेत. जिह्याच्या सर्वच तालुका स्तरावरील तहसील कार्यालयासमोर विजयी उमेदवाराचा जल्लोष पहावयास मिळत आहे. एकमेकांना गुलाल लावत व फटाके फोडून विजयी पॅनलचे समर्थक आपला आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
अतिशय चुरशीने व अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकांत ग्रामपंचायतीवर आपल्याच समर्थकांची सत्ता यावी यासाठी सर्वच पक्षाच्या राजकिय नेत्यांनी कंबर कसली होती. दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी या ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांचे चिरंजीव श्रीदीप हसापुरे हे विजयी झाल्याने गावची सरपंचकीची सुत्रे त्यांच्या हातात जाणार आहेत. या निवडणुकीवर संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.

दक्षिण तालुक्यात सर्वात मोठी लोकसंख्या असणाऱ्या मंद्रूप ग्रामपंचायत निवडणुकीत तीरंगी लढती झाल्या होत्या त्याचे निकाल हि येण्यास सुरुवात झाली असून, येथे भाजपाला मोठा धक्का बसला असून अनिता कोरे या राष्ट्रवादीच्या महिला सदस्या 3747 मते घेऊन प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा 930 जास्तीची मते घेऊन विजयी झाल्या आहेत. तर येथूनच भाजपाच्या प्रभावती हेळकर यासुध्दा 2817 मते घेऊन विजयी झाल्या आहेत. शितल राठोड या देखील 2179 मते घेऊन विजयी घोषित करण्यात आल्या आहेत. बसवनगर ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे उमेदवार निखील सुरेश राठोड हे देखील विजयी झाले आहेत. डी ग्रामपंचायतमध्ये सुवर्णा दिंडोरे या 27 मतानी विजयी झाल्या आहेत.

करमाळा तालुक्यातील 30 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर होतअसून निकालामध्ये तालुक्यात माजी आमदार नारायण पाटील यांच्या गटाने बाजी मारली आहे. तालुक्यात पुन्हा एकदा नारायण पाटील यांच्यावरील निष्ठा या निकालावरुन दिसून येत आहे. त्याचप्रमाणे पंढरपूर तालुक्यातील एकूण 11 ग्रामपंचायतपैकी सात ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येत आहे. तर भाजपच्या गटाकडे फक्त चार ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवता आली आहे. तुंगत ग्रामपंचायतीवर प्रकाश पाटलांचे वर्चस्व राखले असून अमृता रणदिवे या सरपंच पदाच्या उमेदवार विजयी झाल्या आहेत. तसेच बाकीच्या तालुक्यातील मतमोजणी सुरु असून येथील निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे.