Chitra Wagh On Urfi Javed : गेल्या काही दिवसापासून भाजप नेत्या चित्रा वाघ आणि अभिनेत्री ऊर्फी जावेद यांचा वाद महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे. आज पुन्हा एकदा उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं आहे.मेरी डीपी ढासू, चित्रा मेरी सासू, अस ट्विट तिने केलं आहे.यावर प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात नंगा नाच सुरु आहे. महिला आयोग, पोलीस काहीच कारवाई करत नाहीत. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजस्वास्थ खराब होत आहे.चाकणकर ताई म्हणतात चित्रा वाघ कपड्यांच्या तुकड्यांवर बोलते. हे त्यांनाही मान्य केलं का? असा सवालही त्यांनी केला.आज तुळजापूरला त्यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं, यानंतर त्यांनी पत्रकारांशा संवाद साधला.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, मी ऊर्फीच्या विरोधात नाही, तिच्या विकृतीच्या वावरण्याला आक्षेप आहे. ऊर्फी रस्त्यावर विकृत कपड्यात फिरुन मुलांना उत्तेजित करतेय, असा आरोपही त्यांनी केला. नंगा नाच करणाऱ्या विकृतीला समर्थन करणाऱ्यांना सद्बुध्दी दे, आणि विकृती विरोधात लढायला आम्हाला बळ दे असं साकड आज भवानी मातेला घातल्याची त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना त्यांनी रूपाली चाकणकरांवर निशाणा साधला.
रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ यांच्यात वयक्तिक वाद आहे का? याविषयी बोलताना त्या म्हणाल्या, मी माझ्या सहकाऱ्यांसोबत मैत्रिणी सारखे वागते. चाकणकर पक्ष सोडून जाणार होत्या मी त्यांना थांबवल.पक्ष सोडताना रूपाली चाकणकरांना जागा रिकामी झाल्याचा फोन मी केला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यानंतर रूपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देतात हे पाहावे लागणार आहे.
Previous Article‘सीईटी’चे संभाव्य वेळापत्रक जाहीर
Next Article शिक्षक भरतीच्या मागणीसाठी पुण्यात उपोषण
Related Posts
Add A Comment