उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्हय़ात एक अद्भूत घटना घडली आहे. त्यातून देव तारी त्याला कोण मारी? या म्हणीची प्रचिती आल्याखेरीज राहात नाही. येथे एका रस्त्यावर एका गर्भवती महिलेच्या अंगावरून ट्रक गेला. त्यामुळे तिचे पोट फाटून आतील अर्भक पाच फूट लांब उडून पडले. अपघातात महिलेचा मृत्यू झाला, पण तिच्या पोटातील अर्भक मात्र जिवंत राहिले. हे अर्भक एक स्त्राr जातीचे असून रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिला इन्क्मयुबेटरमध्ये ठेवण्यात आले आहे. तिची प्रकृती धोक्मयाबाहेर असली तरी शरीरात अंतर्गत भागात जखमा झाल्या असल्याची शक्मयता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे तिच्यावर रात्रंदिवस लक्ष ठेवण्यात येत असून प्रकृतीत सुधारणा दिसत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या अर्भकाचा पिता आग्रा जिल्हय़ातील आहे. त्याचे नाव रामू असून तो आपली पत्नी कामिनी हिच्यासह बाईकवरून आपल्या सासरवाडीला निघाला होता. त्याची सासरवाडी फिरोजाबाद जिल्हय़ातील नारखीथाना या खेडय़ात आहे. त्याची पत्नी नऊ महिन्यांची गर्भवती होती. जाताना त्याच्या दुचाकीचा अपघात झाला आणि पत्नी ट्रकखाली सापडली. तिचा जागीच मृत्यू झाला. परंतु, सुदैवाने तिच्या पोटातील मुलगी बचावली. हे वृत्त ऐकताच महिलेच्या काकांना अनावर धक्का बसून त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अपघातानंतर त्वरित आजूबाजूच्या लोकांनी त्यांना साहाय्य केले आणि महिलेला अत्यंत गंभीर आणि रक्तबंबाळ स्थितीत रुग्णालयात पोहोचविले. तसेच तिच्या पोटातून उडालेल्या अर्भकालाही रुग्णालयात पोहोचविण्यात आले. ही घटना नऊ दिवसांपूर्वीची आहे. आता रामू आणि त्याच्या कुटुंबाच्या आशा या अर्भकावर खिळल्या आहेत. अर्भकाला थोडे दूध पाजण्यात आले असून ते त्याला पचले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यामुळे अर्भक वाचविण्याची शक्यता बळावली आहे.
Previous Articleतैवानविरोधात सेना सरावाची चीनची घोषणा
Next Article बहुतेकांना कोर्ट परवडत नाही !
Related Posts
Add A Comment