अंगिरा धरने डिजिटल माध्यमाचं महत्त्व कधीच ओळखलं होतं. यशराज फिल्म्सच्या ‘बँड, बाजा बारात’ आणि नेटफ्लिक्सच्या ‘लव्ह पर स्क्वेअर फीट’ या वेब सिरिजमध्ये ती झळकली. त्यानंतर तिने ‘कमांडो 3’ हा चित्रपट केला. अंगिराला ‘कमांडो 3’ मध्ये ऍक्शन करायची संधी मिळाली. आता तिला आणखी मोठी संधी मिळाली आहे. अनुराग कश्यप ‘तल्ख’ हा पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट करतोय. या चित्रपटात अंगिरा झळकणार आहे. या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यामुळे ती खूप खूश आहे.
Previous Articleदेशात दिवसभरात आणखी तिघांचा मृत्यू
Next Article कर्नाटकात कोरोनाबाधितांची संख्या 26