नवी दिल्ली
अंबुजा सिमेंटचा 31 मार्चला संपलेल्या नवीन वर्षातील पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 6.80 टक्क्मयांनी वधारुन 742.59 कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. मागील वर्षातील समान तिमाहीत कंपनीचा नफा 695.30 कोटी रुपयांचा झाला होता. बीएसईला पाठविण्यात आलेल्या माहितीनुसार कंपनीने म्हटले आहे, की उत्पन्न 8.50 टक्क्मयांनी घटून 6,249.66 कोटी रुपये झाले आहे तर कंपनीचा खर्च 2.44 टक्क्मयांनी घटून 5,388.38 कोटी रुपयांवर आल्याचे स्पष्ट केले आहे.