नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटेस्टिक्सची आकडेवारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या विळख्यात असणारे जगातील उद्योग क्षेत्र संकटाच्या कात्रीत सापडले आहे. यात 2020 मधील पहिल्या तिमाहीतील(जानेवारी-मार्च) कामगिरीत चीनच्या प्रमुख औद्योगिक कंपन्यांच्या नफ्यात मोठी घसरण झाली आहे. सदर कंपन्यांचा लाभ वार्षिक पातळीवर 36.7 टक्क्यांनी घसरला आहे, अशी माहिती नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटेस्टिक्स यांच्याकडून देण्यात आली आहे.
एनबीएसच्या तुलनेत जानेवारी ते फेब्रुवारी या तीन महिन्यांच्या कालावधीत कंपन्यांचा निव्वळ नफा 38.3 टक्क्मयांचा झाला आहे तर मार्चमध्ये या कंपन्यांचा निव्वळ नफा 34.9 टक्क्मयांनी घटला आहे. एनबीएसच्या यादीनुसार 39 क्षेत्रात जानेवारी-मार्च तिमाहीत घसरण नोंदवण्यात आली आहे.
विविध व्यवसाय अडचणीत
कोरोनाच्या प्रभावामुळे प्रमुख उद्योगांच्या अडचणी वाढल्या आहेत. यात तेल कोळसा आणि अन्य इंधनांचा-187, मशीन व अन्य उपकरणांचा दुरुस्ती उद्योग -84.3, ऑटोमेशन -80.2, रसायन उद्योग -56.5, कापड उद्योग -38.8, फूड उत्पादन -27.4 टक्के आणि औषध उद्योग -15.7 टक्क्मयांनी नुकसानीत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. दुसऱया बाजूला तंबाखु उद्योग 28.5 टक्क्मयांनी व शेती व अन्न उत्पादन उद्योग मात्र 11.2 टक्क्मयांनी नफ्यात राहिला आहे.