प्रतिनिधी /अक्कलकोट
अक्कलकोट शहरातील कांदा बाजार येथील दुकानासमोर पत्राशेडमध्ये दोरीने गळफास घेवून ५२ वर्षीय पुरुषांने आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना दि १३ जून रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली.
याबाबत माहिती अशी की, तुकाराम भीमराव मोरे वय ४० रा अक्कलकोट यांचे कांदा बाजार येथे खत बी बियाणे औषध दुकान आहे. दि १२ रोजी ४ वाजता आपले दुकान बंद करून घरी गेले.दि १३रोजी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता एक ५२ वर्षीय अनोळखी पुरुष दुकानासमोर पत्राशेडच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत दिसला.
त्या नंतर सदर घटनेविषयी तुकाराम भीमराव मोरे यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात खबर दिली.सदर मयत व्यक्तीचे वर्णन असे ५२ वर्षीय अनोळखी पुरुष जातीचे इसम,सडपातळ बांधा,सरळ नाक,उभा चेहरा,अंगात पांढरा बनियन,काळे पांढरे पट्टे असलेला बरमोडा केस काळे पांढरे असे आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार राजेंद्र फुलारी हे करीत आहेत.