दोडामार्ग – वार्ताहर-
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथून स्वामी समर्थांच्या पादुका व मूर्तीचे येत्या 18 डिसेंबर रोजी दोडामार्ग शहरात आगमन होणार आहे. या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दत्त जयंती दिनी या पादुका दोडामार्गात येत आहेत.
शनिवारी सायंकाळी 5.30 वाजता ही पालखी दोडामार्ग शहरात प्रवेशणार असून राष्ट्रोळी मंदिर ते पिंपळेश्वर हॉल – बाजारपेठपर्यंत पादुकांची मिरवणूक येणार आहे. सायंकाळी 7.30 वाजता आरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भूमिका दिंडी ग्रुप कासारपाल गोवा यांच्या दिंडीचा खास कार्यक्रम सादर होणार असून भाविकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन दोडामार्ग तालुका स्वामी समर्थ भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.