जत / प्रतिनिधी :
जत तालुक्यातील शिंगणहळ्ळी येथील चेकपोस्ट वर कार्यरत असणाऱ्या त्या चार पोलीस कर्मचारी व सात स्वयंसेवक अशा अकरा जणांचे कोरोनो रिपोर्ट अखेर निगेटिव्ह आले आहेत, यामुळे जत तालुक्यासह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
तालुक्यातील सोलापूर हद्दीवर असणाऱ्या शिंगणहळ्ळी चेकपोस्ट वर कार्यरत असणाऱ्या चार पोलीस कर्मचारी व सात स्वयंसेवक यांना चार दिवसांपूर्वी क्वारंटाईन करून त्यांचे स्वाब घेण्यात आले होते. या चेकपोस्ट जवळ असणाऱ्या सोलापूर हद्दीतील चेकपोस्ट वर असणाऱ्या एक पोलीस कर्मचारी कोरोनो पॉझिटिव्ह होत. यामुळे दक्षता म्हणून येथे कार्यरत असणाऱ्या 11 लोकांना तातडीने कोरेनटाईन करून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते, यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. त्यांचे अहवाल काय येणार याकडेसगळ्यांचे लक्ष लागून होते. अखेर गुरुवारी या 11 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य कार्यालयातून देण्यात आली, या बातमीमुळे जत तालुक्याला चांगला दिलासा मिळाला आहे. दरम्यान घोरपडी संपर्कातील बेवणुरच्या सहा जणांना कालपासून क्वारंटाईन केले आहे. त्या सगळ्यांचे देखील स्वाब घेण्यात येणार आहेत.