गाडीच्या दर्शनी भागाचा चक्काचूर
प्रतिनिधी / म्हापसा
रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान पणजीतून म्हपशाच्या दिशेने येणाऱया व्हेंचर गाडीने अटल सेतूवर डिव्हायडरला ठोकर दिल्याने या अपघातात आरटीआय कार्यकर्ते राजेंद घाटे (रा. आसगाव) हे जबररित्या जखमी झाले असून त्याचा उजवा पाय निकामी झाला आहे. अग्निशामक दलाच्या जवानानी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन गाडीचे पत्रे कापून त्याना बाहेर काढण्यात आले. सध्या त्याना गोमेकॉत उपचाराकरीता ठेवण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र घाटे आपल्या व्हेचर टाटा कारक्रमांक जीए 03-एच-8634 ने म्हापशाच्या दिशेने येत असता पुढून अचानक कारने ओव्हर टेक केल्याने राजेंद घाटचा तोल गेल्याने त्यांनी आपली गाडी डिव्हायडरला ठोकली हा अपघत इतका जबरदत्त होता की, व्हेंचर गाडीच्या दर्शनी भागचा चक्काचूर झाला.
घटनेची माहिती मिळाल्यावर अग्निशामक दलाचे पणजी अधिकारी दिलीप गावस, उपअधिकारी सखाराम पेडणेकर, लिडींग फायर फायटर संजू, लिंगूडकर, महेश गावस, योगेश मायणकर, सिद्धेश परब व सचिन परब, महेश माजिक यांनी टुल्सद्वारे गाडीचा पत्रा कापून घटे यांना बाहेर काढले पणजी पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला.