प्रतिनिधी/सातारा
साताऱयाचे अप्पर पोलीस अधीक्षक पदी राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त अजित बोऱहाडे यांची वर्णी लागली आहे. बुधवारी त्यांनी पदाभार स्विकारला आहे. तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांची मुंबई महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक पदावर बदली झाली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱहाडे हे 2005 सालच्या बॅचचे पोलीस उपअधीक्षक आहेत. त्यांनी आतापर्यंत दौंड एसआरपीएफ, अंबेजोगाई, मुंबई येथे सेवा बजावली आहे. 2015 साली त्यांचे प्रमोशन झाले असून ते मुळचे पुणे जिह्यातील आहेत. तत्कालीन पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वाई येथील दुहेरी खून प्रकरणाचा छडा त्यांनी लावला. पोलीस वसाहत, कोरोना काळात उभारलेले पोलिसांसाठीचे हॉस्पिटल, पोलीस कल्याण निधी, लोकसभा-विधानसभा निवडणूकांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले. तसेच महिला अत्याचारासंदर्भात पोलीस विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या पायलट प्रोजेक्टचे कामकाजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू होते. त्यांच्या कार्यपद्धतीचे सातारा जिह्यात कौतुक होत असून कामाच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून अजित बोऱहाडे यांच्याकडून सातारा जिल्हावासियांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. साताऱयात लॉ ऍन्ड ऑर्डर अबाधित ठेवण्याबरोबरच अनेक ठोस कामे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.