नवा प्रवास – ‘सिक्रेट्स ऑफ सिनौली’त दिसून येणार
रंगमंच, मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये छाप पाडल्यावर मनोज वाजपेयी आता एका नव्या अवतारात दिसून येतील. मंगळवारपासून डिस्कव्हरी ऍप आणि वाहिनीवर माहितीपट ‘सिक्रेट्स ऑफ सिनौली-डिस्कव्हरी ऑफ द सेंच्युरी’चे सूत्रसंचालन करताना मनोज वाजपेयी दिसून येणार आहेत. दिग्दर्शक नीरज पांडे यांच्या बॅनरखाली याची निर्मिती करण्यात आली आहे.
सूत्रसंचालनही उत्तम काम
सूत्रसंचालन करणे हे देखील उत्तम काम आहे, या कार्यक्रमात भारतात सोन्याचा धूर निघत होता अशाकाळातील म्हणजेच 4000 वर्षे जुनी कथा सांगण्यात येत आहे. मला इतिहासात रस राहिला आहे. नीरज पांडे याची निर्मिती करत असल्याने याला नकार देणे शक्यच नव्हते. हा माहितीपट अत्यंत प्रभावी असून यातून इंग्रजांच्या अनेक थ्योरींचा पर्दाफाश होणार असल्याचे मनोज वाजपेयी यांनी म्हटले आहे.
बेयर गिल्स प्रभावी
सूत्रसंचालनात बेयर ग्रिल्स सर्वात रंजक वाटतात. मी त्यांच्याप्रमाणे साहसी कृत्ये करू शकत नाही. ऐतिहासिक संदर्भ असलेल्या चित्रपटांवर सध्या मोठय़ा प्रमाणात काम होत आहे. संधी मिळाल्यास सम्राट अशोक यांची भूमिका साकारण्याची माझी इच्छा असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
गांधींच्या व्यक्तिरेखेचे आकर्षण अशोक यांच्यासह गांधींची व्यक्तिरेखाही मोठय़ा प्रमाणावर आकर्षित करते. त्यांच्याविषयी जितके वाचू, बोलू ते कमीच ठरणार आहे. गांधींनी देशाला नवा मार्ग दाखवून दिला. गांधींची भूमिका साकारणे सोपे नाही. गांधींना साकारण्यासाठी त्यांची जीवनशैली सर्वप्रथम स्वीकारावी लागणार असल्याचे मनोज यांनी म्हटले आहे.