ऑनलाईन टीम / मुंबई :
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना प्रकृती अस्वास्थामुळे पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मुंबई खार येथील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 98 वर्षीय दिलीप कुमार यांना एका नॉन कोविड रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान, दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्यामुळे मंगळवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
- यापूर्वी 6 जूनला रुग्णालयात केले होते दाखल
दरम्यान, दिलीप कुमार यांना याच महिन्यात 6 जून रोजी श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे मुंबईतील खारमधील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डिस्चार्ज देण्याच्या एक दिवस अगोदर एका मायनर सर्जरीमार्फत दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसांत जमा झालेले पाणी काढण्यात आले होते. 5 दिवस रुग्णालयात राहिल्यानंतर 11 जून रोजी दिलीप कुमार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.