ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवाला धोका असल्याचा ईमेल मुंबईतील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या मुख्य कार्यालयाला आला आहे. या मेलमध्ये म्हटले आहे की, ‘येत्या काही दिवसांत गृहमंत्री अमित शाह आणि योगी आदित्यनाथ या दोन्ही नेत्यांवर धार्मिक ठिकाणी हल्ला केला जाईल,’ ईमेल आल्यानंतर सीआरपीएफसह इतर एजन्सींना सतर्क करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वीही अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांना जीवे मारण्याची धमकी देणारी पत्रे मिळाली होती.