वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेची महिला टेनिसपटू कोको गॉफला कोरोनाची बाधा झाल्याने तिला 23 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
17 वर्षीय गॉफची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ती पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. टोकियो ऑलिंपिक स्पर्धा हुकल्याबद्दल गॉफने निराशा व्यक्त केली आहे. 2000 नंतर ऑलिंपिक स्पर्धेत खेळणारी सर्वात कमी वयाची महिला टेनिसपटू होण्याचा बहुमान गॉफला मिळणार होता, पण कोरोनामुळे तिला टोकियो ऑलिंपिक स्पर्धेला मुकावे लागत आहे. महिला टेनिसपटूंच्या मानांकन यादीत गॉफ 25 व्या स्थानावर आहे. आता टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत राफेल नदाल, रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स, हॅलेप, थिएम, वावरिंका, किर्गीओस आणि गॉफ यांनी माघार घेतली आहे.