ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अमेरिकन वेळेनुसार सकाळी 6 वाजता मतदान प्रक्रिया सुरू होणार असून, रात्री 9 वाजता संपेल. तर भारतीय वेळेनुसार मंगळवारी संध्याकाळी 4.30 वाजेपासून मतदान सुरू होईल.
राष्ट्राध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन रिंगणात आहेत. अमेरिकेच्या 50 राज्यातील 24 कोटी मतदार आज मताधिकार वापरतील.
दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विस्कॉन्सिन, पेनसिल्वानिया, फ्लोरिडा आणि ॲरिझोना या चार प्रमुख राज्यांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांना रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षा अधिक मते मिळण्याचा अंदाज ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त झाला आहे.
तर ट्रम्प यांना कोणत्याही राज्यात 44 पॉइंट्सहून अधिक पाठबळ नाही. त्यामुळे त्यांना विजयासाठी मोठी कसरत करावी लागेल, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.