ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनामुळे संकटात आलेल्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी 1.9 ट्रिलियन डॉलरचे म्हणजेच 139 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे.
राष्ट्रीय लसीकरण मोहिमेला गती देणे, कोरोनामुळे कोलमडलेल्या व्यवसायांना आधार देणे आणि सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक मदत करणे हा या पॅकेजचा मुख्य हेतू आहे. ‘अमेरिकन रेस्क्यू प्लॅन’ असे या पॅकेजला नाव देण्यात आले आहे.
देशव्यापी लसीकरण मोहिमेसाठी 20 अब्ज डॉलरची वेगळी रक्कम बाजूला ठेवण्यात आली आहे. तर चाचण्यांचा वेग वाढविण्यासाठी 50 अब्ज डॉलर खर्च केले जाणार आहेत. या पॅकेजमधून प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यात 1400 डॉलर म्हणजेच जवळपास एक लाख रुपये थेट जमा केले जाणार आहेत. नोकरदारांना प्रती तासाच्या हिशोबाने किमान वेतन देण्यासाठी 15 डॉलर निधीचा वापर केला जाणार आहे.