परशुराम सेनेबरोबरचर इतर.स्वयंसेवी संघटनांची मागणी : डिचोली पोलीस स्थानकात अत्याचारीत मुलीच्या न्यायासाठी लोकांचा जमाव. चार दिवसांत इतरांची चौकशी करण्याचे पोलीस निरिक्षकांचे आश्वासन.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोली शहर परिसरातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी सध्या डिचोली पोलिसांनी एक संशयित अरमान खान (19) याला अटक केली आहे. मात्र या बलात्कार प्रकरणात एकापेक्षा अधिक युवकांचा समावेश असल्याचा संशय असल्याने डिचोली पोलिसांनी या प्रकरणात असलेल्या इतर सर्व संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करावी व सदर मुलीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यासाठी राज्यातील परशुराम सेनेच्या शैलेंद्र वेलिंगकर यांच्यासह इतर स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींनी डिचोली पोलीस स्थानकात उपस्थिती लावून मागणी केली.
गेल्या 25 जून रोजी डिचोली पोलीस स्थानकात एका 15 वषीय विद्यार्थिनीवर मुस्लीमवाडा डिचोली येथील अरमान खान या युवकाने बलात्कार केल्याची तक्रार नोंद झाली होती. या प्रकारामुळे सदर मुलगी 8 महिन्यांची गरोदर असून बांबोळी येथे उपचारार्थ गेली असता हे प्रकरण उघडकीस आले होते. बांबोळी येथील गोमेकॉतून डिचोली पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर या प्रकरणाची रितसर तक्रार डिचोली पोलीस स्थानकाचे निरिक्षक महेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदविण्यात आली होती. व संशयित आरोपी अरमान खान याला अटक करण्यात आली होती.
या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच परशुराम सेनेचे शैलेंद्र वेलिंगकर यांना, या प्रकरणात एकच संशयित सहभागी नसून आणखीनही युवकांचा सहभाग असल्याने चौकशीअंती आढळून आले होते. त्यामुळे त्यांनी एक व्हिडिओ समाज माध्यमांच्या माध्यमातून व्हायरल करताना डिचोली पोलीस स्थानकात पोलीस निरिक्षकांची भेट घेण्याचे जाहिर केले होते. तसेच जागरूक डिचोलीतील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार काल सोम. दि. 5 जुलै रोजी डिचोली पोलीस निरीक्षक महेश गडेकर यांची शैलेंद्र वेलिंगकर यां?नी भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष विनायक नानोसकर, महिला कार्यकर्त्या तारा केरकर, शिवसेना महिला प्रमुख ऐश्वर्या साळगावकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर राव, सलमान खान, रेश्मा बिलजी, प्रिया जाधव, श्री माने, सुनील सांतीनेजकर व इतरांची उपस्थिती होती.
यावेळी सर्व उपस्थितांनी पोलीस निरिक्षक महेश गडेकर यांच्याशी संपूर्ण विषयांवर चर्चा केली. संशयितांने नावे दिलेल्या इतर युवकांनाही येत्या चार दिवसांत चौकशीसाठी आणून त्यांचीही सखोल चौकशी करण्यात येणार आहे. येत्या 9 जुलै रोजी पिडीत मुलीची डिचोली प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱयांसमोर जबानी नोंदविण्यात येणार आहे. सदर जबानीनंतर या प्रकरणाची खरी दिशा समोर येणार आहे. तक्रारीत पिडीत मुलीने एकाच संशयिताचे नाव समोर केले आहे. आता सदर संशयित आरोपी इतरांची नावे पुढे आणत असल्याने त्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी आतापर्यंत योग्य मार्गानेच चालू असून यापुढेही हि चौकशी त्याच पध्दतीने चालू राहणार आहे, असे आश्वासन यावेळी पोलीस निरिक्षक महेश गडेकर यांनी उपस्थितांना दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि सांस्कृतिक महत्त्व लाभलेल्या डिचोली शहरात घडलेली हि घटना अत्यंत वाईट आणि दुर्दैवी आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार होऊन ती गर्भवती राहते आणि या प्रकरणात एकापेक्षा अधिक संशयित असल्याची माहिती समोर येते आणि पोलीस हातावर हात ठेवून गप्प बसतात, हि बाब आपल्याला खटकली. याचा आपल्याला भरपूर त्रास झाला. अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये व कोणतीही मुलगी किंवा युवती अशा छळाला बळी पडू नये म्हणूनच आपण डिचोली पोलीस पोलीस निरिक्षकांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्यांची भेट घेतल्यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी येत्या चार दिवसांत या प्रकरणात गुंतल्याचा संशय असलेल्या सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. जर या आश्वासनावर निरिक्षक फोल ठरले तर आम्हीही गप्प बसचार नाही, पुन्हा डिचोली पोलीस स्थानकात धडक दिली जाईल, असा इशारा परशुराम सेनेचे शैलेंद्र वेलिंगकर यांनी यावेळी दिला.
हे प्रकरण गंभीर आचि तितकेच नाजूक आहे. लैंगिक छळाचा प्रकार घडल्यानंतर पोलिसांना आठ महिने हि बाब डिचोली पोलिसांना समजली नाही. मात्र बांबोळीत सदर मुलगी व तिची आई पोहोचल्यानंतर हि बाब उघडकीस आली. आणि त्याच्या चौकशीला सुरूवात झाली. तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आता सदर आरोपिच जर इतरांची नावे सांगत असेल तर त्यावर कितपत विश्वास ठेऊ शकतो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण इतरांची नावे या प्रकरणाशी जोडून सदर संशयित आरोपी पिडीत मुलीची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्नही करू शकतो. असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. त्यासाठीच सदर पिडीत मुलीची जबानी एनजीओ समोर घेण्यात यावी, अशी मागणी आपण पोलीस निरिक्षकांसमोर केली आहे, असे तारा केरकर यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे किशोर राव यांनी, या प्रकरणी मुख्यमंत्री आणि सभापती गप्प का ? असा सवाल केला. या प्रकरणी त्यांनी यापूर्वीच लक्ष घालून सखोल चौकशीचे आदेश देणे गरजेचे होते, असे म्हटले. याच पक्षाचे सलमान खान यांनी, आमच्या गोला राज्यात बाहेरून येणाऱया लोकांवर आमचे नियंत्रण नाही. केवळ वोटबँ?कच्या हव्यासापोटी राजकारणी अशा लोकांना आश्रय देतात. आणि अशा लोकांमुळे आज गोवा राज्याची प्रतिमा मलिन होत चालली आहे. या राज्यात बलात्कार होत असल्याने पर्यटकही या राज्यात येण्याची धास्ती घेतात, असे म्हटले. एका अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात एक आरोपीला पोलीस अटक करतात आणि त्याच्याकडून इतर संशयितांची नावे उपलब्ध होतात. तरीही पोलीस त्यांची चौकशी न करता गप्पच राहतात. हि बाब असमर्थनीय आहे. आता पोलीस निरिक्षकांनी आश्वासन दिल्याप्रमाणे जर चार दिवसांत इतर संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी व कारवाई न केल्यास या प्रकरणी गप्प बसणार नाही, असा इशारा राष्ट्रीय हिंदू म आसभेचे अध्यक्ष विनायक नानोसकर यांनी दिला आहे.