अल्फा, बीटा, गॅमा, झीटा, ऍप्सेलॉन ही साधारणतः अडीच हजार वर्षांपूर्वी शोधली गेलेली ग्रीक मूळाक्षरे आहेत. या ग्रीक किंवा लॅटिन भाषेत अशी 24 मूळाक्षरे आहेत. त्यात वरील मूळाक्षरांबरोबरच डेल्टा, ऐटा, थिटा, इवोटा, लांबडा, पाय इत्यादी मूळाक्षरेही आहेत. पण अल्फा, बीटा आणि गॅमा यांनी बऱयाच क्षेत्रांमध्ये लोकप्रियता मिळविल्याचे दिसून येते. या मूळाक्षरांचा गणितात तर सर्रास वापर केला जातोच, शिवाय वादळांपासून जीव-जंतूंपर्यंत अनेकांना त्यांची नावे दिली जातात. सध्याच्या कोरोना काळात या मूळाक्षरांना पुन्हा महत्त्व आले आहे.
या मूळाक्षरांचा उपयोग इतिहास, शास्त्राrय संशोधन, धर्म, तत्त्वज्ञान, गणित, वैद्यक शास्त्र आदी क्षेत्रांमध्ये केला जातो. अनेक देशांच्या सेनादलांमध्ये सांकेतिक संदेश देण्यासाठीही ही मूळाक्षरे उपयोगात आणली जातात. काही म्युच्युअल फंड आणि आर्थिक गुंतवणुकीच्या योजनाही यांच्या नावाने अस्तित्वात आल्या आहेत.
सध्या या मूळाक्षरांना पुन्हा महत्त्व आले आहे. ते कोरोनाच्या विविध रुपांमुळे कोरोनाच्या नव्या तीन रुपांना अल्फा, बीटा, गॅमा अशी नावे देण्यात आली आहेत. ती देण्याचे कारण असे झाले, की अनेक देशांनी त्यांच्या नावे कोरोना रुपे ओळखली जाण्यास आक्षेप नोंदविला. या विषाणूंना देशांची नावे दिल्यास या देशांची प्रतिष्ठ धोक्यात येईल, असे आक्षेप घेण्यात आले. सर्वप्रथम चीनने हा आक्षेप घेतला. त्यामुळे अखेर निरुपद्रवी अशा ग्रीक मूळाक्षरांची निवड करण्यात आली. त्यामुळे आता विषाणूही त्यांच्या नावाने ओळखले जाणार आहेत.