प्रतिनिधी/ सातारा
संचारबंदीचा आदेश असताना देखील साताऱयातील सदरबझार येथे सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाढदिवस साजरा करुन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात बर्थ डे बॉय प्रशांत पवार याच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 रोजी रात्री साठे आठ वाजण्याच्या सुमारास काही युवक रस्त्यावर एकत्र जमून वाढदिवस करत असल्याची माहिती मिळाली. शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी तिथे गेले असता सदरबझार येथे सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून प्रशांत पवार (रा. सदरबझार, सातारा) याच्या वाढदिवसाचा केक कापण्याचा कार्यक्रम केला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या विजय पवार, नितीन पवार, अमित सोलंकी, लक्ष्मण जाधव, सलीम, अमर पवार, गुलाब यादव, भारत सोलंकी (सर्व रा. सदरबझार, सातारा) व त्यांच्यासमवेत अनोळखी चार ते पाचजणांवर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांविरुध्द पोलीस कर्मचारी विशाल धुमाळ यांनी तक्रार दिली आहे. शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱयांनी ही कारवाई केली असून या गुन्हय़ाचा पुढील तपास हवालदार भिसे करत आहेत.