प्रतिनिधी /बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱया अळणावर ते आंबेवाडी या दोन रेल्वेस्थानकादरम्यान शनिवारी विद्युत इंजिन धावले. विद्युत इंजिनची यशस्वीरित्या चाचणी पार पडल्यामुळे रेल्वे कर्मचाऱयांनी आनंद व्यक्त केला. त्यामुळे पुढील काळात या मार्गावर विद्युत इंजिन असणाऱया रेल्वे धावणार आहेत.
नैर्त्रुत्य रेल्वेकडून सर्व रेल्वेमार्गांचे विद्युतीकरण केले जात आहे. सध्या सुरू असलेल्या डिझेल इंजिनमुळे पर्यावरणाचा ऱहास होत आहे. यामुळे सर्वत्र विद्युतीकरण केले जात आहे. यामुळे पर्यावरणाचे संवर्धन तर होईलच पण होणारे प्रदूषणही टाळता येणार आहे.
इलेक्ट्रिक लोको ट्रायल यशस्वा
अळणावर ते आंबेवाडी या 25 कि. मी. च्या रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले. शनिवारी या मार्गावर इलेक्ट्रिक लोको ट्रायल घेण्यात आली. ती यशस्वीरित्या पूर्ण झाली.