घुणकी / वार्ताहर
वाठार-वडगांव रुस्त्यावर घाटगे सर्विसिंग समोर मालवाहू अॅपेरिक्षावरील ताबा सुटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झालेची घटना सायंकाळी सातच्या दरम्यान घडली.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वडगांव येथील भंगार व्यवसायिक वडगांवहून पारगांवकडे भंगार साहित्य घेवून अॅपे एम.एच.११ एजी ३५३२ या गाडीतून घेवून जात असताना घाटगे सर्विसिंग समोर गाडीवरील ताबा सुटून गाडी पलटी झाली. गाडीखाली सापडून विशाल अरुण गोसावी (वय १८ रा. पेठवडगांव) याचा जागीच मृत्यू झाला. तर संदिप चंदर गोसावी व अविनाश प्रल्हाद पाडियार (रा. पेठवडगांव) हे जखमी झाले आहेत. याबाबत वडगांव पोलिसात उशिरापर्यंत अपघात दाखल करण्याचे काम सुरू होते.