क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
राणी चन्नम्मा विद्यापीठ सिंगल झोन हॉकी निवड चाचणीत निवडण्यात आलेला पुरूष संघ बेंगळूर येथे तर महिला संघ कोडगू येथे आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेसाठी रवाना झाले.
बेळगाव येथे झालेल्या आरसीयू आंतरविद्यापीठ हॉकी निवड चाचणीत आरसीयूचा हॉकी पुरूष संघ निवडण्यात आला. त्यात सुहास अंगडी बागलकोट, सागर बाबले गोगटे, रघु कामभावी विजापूर, मारूती कासवगोड आरपीडी, बी. आर. कालोजी बेळगाव, किरण पाटील हारूगीरी, बी. जी. मंची बन्नट्टी, निखील व्ही. एच. बागलकोट, तेजस निंबाळकर गोगटे, सी. एस. कोटबागी बन्नट्टी, प्रज्वल हत्ती विजापूर, मल्लाप्पा खजन्नवर चिकोडी, माजीद मुल्ला इस्लामिया, विजयकुमार वेगामुडी विजापूर, बसवराज हुगरण्णावर बागलकोट, सचिन राठोड विजापूर, रमेश बडगेर हारूगिरी, सुरेश बागलकोट या 18 खेळाडूंचा संघ बेंगळूरला रवाना झाला आहे. कल्याणी डुकरे जीएसएस, प्राजक्ता निलजकर गोगटे, दर्शना रावकोजी बैलहोंगल, आरती देसाई व प्रतिक्षा तोरोशी दोघीही यूके, प्रिया जाधव लिंगराज, नागेश्वरी धामणेकर लिंगराज, श्रुती श्रेजल आरएलएस, सुमा देवणगणी बागलकोट, शर्वरी कारेकर जीएसएस, विजयालक्ष्मी मुलीमनी आरपीडी, धनश्री शिंदे गोगटे, श्वेता हणमनी गोगटे, श्रेया हुंदळेकर गोगटे, अर्पिता पाटील गोगटे, ऐश्वर्या जीरली गोगटे, स्नेहा हंबरगी गोगटे, शिवानी राठोड गोगटे हा महिलांचा संघ कोडगू येथे आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.