आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
आंबेवाडी गावच्या रस्त्यासाठी 4 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. यामधून उत्तम दर्जाचा रस्ता तयार होणार असल्याचे ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना त्यांनी ही माहिती दिली.
ग्रामीण मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत पाऊल उचलण्यात आले आहे. विकास होत असताना काही जण विकास होत नसल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करत आहेत. मात्र जनता चांगलीच ओळखून असून माझ्या पाठीशी ठामपणे आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. काहीजण माझ्याविषयी अप्प्रचार करत आहेत. मात्र मी सर्व रस्ते करण्यासाठी प्रयत्न करत आहे. महत्त्वाचे म्हणजे उत्तम दर्जाचे रस्ते करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला सूचना करत आहे. त्यामुळे ग्रामीण मतदारसंघामध्ये विकास हा होणारच आहे. तोही चांगल्या दर्जाचा होईल, असे हेब्बाळकर म्हणाल्या.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह चन्नराज हट्टीहोळी, युवराज कदम, अमोल भातकांडे, विक्रम तरळे, कुलदीप तरळे, शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते.