डिस्चार्ज झालेले दोघे हिरेबागेवाडी व कुडची येथील रहिवासी
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुक्त झालेल्या दोघांना आज बेळगाव जिल्हा इस्पितळातून घरी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोमनहळ्ळी यांनी दिली. हिरेबागेवाडी व कुडची येथील या दोघांवर उपचार करण्यात आले होते. जिल्हय़ात एकूण 74 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 36 कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.