13 हजार जणांना लागण : 9 हजार बाधितांची कोरोनावर मात :
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या पाच महिन्यांत जिल्हय़ात 1 लाख जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. अलीकडे आरोग्य विभागाने स्वॅब तपासणी वाढविली आहे. जिल्हय़ातील 83 हजार 529 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 13 हजार 30 जणांचे अहवाल आतापर्यंत पॉझिटिव्ह आले आहेत. 9 हजार 284 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
बुधवारी जिल्हय़ातील आणखी 324 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 131 जणांचा समावेश आहे. शहर व उपनगरांतील 99, ग्रामीण भागातील 32 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बिम्स व खासगी इस्पितळांतील कर्मचाऱयांचाही यामध्ये समावेश आहे. गेल्या 24 तासांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बेळगाव, चिकोडी तालुक्मयांतील प्रत्येकी दोन व बैलहोंगल तालुक्मयातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 9 हजार 284 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आणखी 2 हजार 168 जणांचा अहवाल यायचा आहे.
3 हजार 549 सक्रिय रुग्णांवर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. बुधवारी दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्या 132 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. मृतांचा सरकारी आकडा 197 इतका आहे. तर 27 हजार 913 जण अद्याप होमकेअरमध्ये आहेत.
मुतगा, गणेशपूर, कंग्राळी बी. के., पिरनवाडी, अष्टे, देवगिरी, जाफरवाडी, सांबरा, सुळगा-येळ्ळूर, मुत्नाळ, मच्छे, येळ्ळूर, शिंदोळी, धामणे, काकती, मुचंडी, वंटमुरी, सुळेभावी, अगसगा, हुदली, अनगोळ, सुभाषनगर, गणेशनगर, केळकरबाग, शाहूनगर, गोंधळी गल्ली, उज्ज्वलनगर, शास्त्राrनगर, खासबाग, वडगाव, हिंदवाडी, टिळकवाडी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
बिम्समधील एका परिचारिकेसह चौघा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आझमनगर, महांतेशनगर, कॅम्प, तानाजी गल्ली, चौगुलेवाडी, जयनगर, नानावाडी, पोलीस क्वॉर्टर्स, सहय़ाद्रीनगर, कणबर्गी, भांदूर गल्ली, शिवाजीनगर, मार्कंडेयनगर, टीव्ही सेंटर, अशोकनगर, राणी चन्नम्मानगर, बसवन कुडची, किणये, महाद्वार रोड, भडकल गल्ली, विश्वेश्वरय्यानगर, रामतीर्थनगर, भाग्यनगर, अन्नपूर्णावाडी, शिवबसवनगर, श्रीनगर परिसरातही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.