ऑनलाईन टीम / देहरादून :
देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू आहे. अनेक राज्यांनी आपल्या राज्यात मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. त्यानंतर शुक्रवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ रावत सिंह यांनी देखील प्रदेशात सर्वांना मोफत लसीकरण केली जाईल अशी घोषणा केली आहे.
ते म्हणाले, 18 ते 45 वर्षाच्या लोकांना देखील मोफत लसीकरण केले जाईल. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात याची सुरुवात केली जाणार आहे. या दरम्यान प्रदेशातील जवळपास 50 लाख नागरिकांना लस दिली जाणार आहे. याचा संपूर्ण खर्च सरकार करणार आहे.
- दिवसभरात 4,339 नव्या रुग्णांची नोंद
प्रदेशात पहिल्यांदाच मागील 24 तासात 4 हजार 339 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 रुग्णांचा मृत्यू झाला. प्रदेशात ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 30 हजारांवर येऊन पोहचली आहे. तर आजच्या काल 1179 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 349 इतकी झाली आहे. यातील 1 लाख 7 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सद्य स्थितीत 29,949 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, प्रदेशात आतापर्यंत 20.21 ( 1.42 %) रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सद्य स्थितीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.48 % इतके आहे.