ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात अंमलबजावणी : राज्याच्या सर्व मालमत्तांचा तपशील अपलोड
प्रतिनिधी /बेळगाव
भूखंड, घर आणि इतर मालमत्ता यांचा सर्व्हे नकाशा करण्यासाठी यापुढे सर्वेअरची गरज नाही. ‘दिशांक’ ऍपमध्ये ग्रामपंचायत पातळीवरील अधिकारीच सर्व्हे करून ई-स्वतू प्रणालीत ई-खाते देण्याची नवीन योजना ग्रामीण विकास आणि पंचायत राज तसेच महसूल खात्याच्या संयुक्त सहकार्याने सुरू झाली आहे.
दिशांक ऍपमध्ये राज्याच्या सर्व मालमत्तांचा तपशील अपलोड करण्यात आला आहे. गुगल प्लेस्टोरवर उपलब्ध असलेले हे ऍप सर्वसाधारण जनतेला देखील अतिशय उपयुक्त ठरणार आहे. हा महसूल खात्याच्या दस्तऐवजमधील 1960 च्या सर्व्हे नकाशाला आधारभूत मानून हे ऍप तयार करण्यात आले आहे.
एखादा भूखंड खरेदी करायचा असेल तर त्याबाबत बऱयाच ठिकाणी पडताळणी करावी लागते. कर्ज काढून एखाद्याने जमीन विकत घ्यायचे ठरवले व या व्यवहारात त्याची फसगत झाली तर याची चिंता करण्याची गरज नाही. दिशांक ऍपमार्फत राज्य सरकारने यावर उपाययोजना शोधून काढली आहे.
दिशांक ऍप
जमिनीच्या नकाशाबाबत माहिती देणारे हे एक सरकारी ऍप आहे. सर्व्हे खात्याचे एक सर्वोत्कृष्ट सॉफ्टवेअर आहे. राज्यातील 30 जिह्यांच्या प्रत्येक भूखंडांची माहिती, सर्व्हे नंबर यांचा यामध्ये समावेश आहे. हे ऍप मोफत असून मोबाईलमध्ये आपल्या ठिकाणाचा तपशील देऊन डाऊनलोड करता येतो. गावठाण हद्दीतील मालमत्तांना कर निर्धारित करण्यासाठी ग्रामपंचायती ई-स्वतू प्रणालीत नमुना 9 आणि 11 ए , 11 बी नुसार ई-खाते वितरित करतात. मालमत्ताधारक ई-खात्यासाठी ग्रामपंचायतीला अर्ज सादर केल्यास सर्वे खात्याकडून सर्वेअर येऊन नकाशा तयार करतो. तसेच मोजणी सॉफ्टवेअरमध्ये ते अपलोड करून ई-स्वतू सॉफ्टवेअरमध्ये ग्रामपंचायत अधिकारी हे ई-खाते वितरित करतात.
सध्या ग्रामपंचायत सेपेटरी किंवा द्वितीय दर्जा लेखाधिकारी जागेवर येऊन गावठाण हद्दीत याचा समावेश होतो का ? याची खात्री करून तसेच अर्जदारांकडून फोटो ओळखपत्र, पत्ता, विस्तार, चकबंदी याची माहिती नोंद करून घेतो. या सर्व बाबींची अर्जदारांकडून पूर्तता करून ई-स्वतू सॉफ्टवेअरवर अपलोड केल्यानंतर दिशांक ऍपला हस्तांतरित करावे लागते. नंतर सेपेटरी अथवा एसडीए, लेखा सहाय्यक प्रत्यक्ष ठिकाणाला भेट देऊन मालमत्तेच्या प्रत्येक कोपऱयात जीपीएस पडताळणी करून फोटो कॅप्चर करतो. यानंतर मालमत्ता गावठाण हद्दीत येते की नाही याची खात्री होते. गावठाण हद्दीत असल्यास पीडीओ दिशांक ऍपमध्ये लॉगिन करून त्याचे दृढीकरण ई-स्वतू प्रणालीत हस्तांतरीत करतो. प्रत्येक अर्जासाठी 200 रु. शुल्क भरावा लागतो.
ऍपचे फायदे
कोणत्याही मालमत्तेचा ठावठिकाणा, सर्व्हे नंबर बसल्या ठिकाणी शोधता येतो. याद्वारे मालमत्तेचा तपशील मिळण्याबरोबरच आजूबाजूचा प्रदेश आणि मालमत्तांची माहिती मिळते. जमिनीचे अतिक्रमण झाले असल्यास त्याची तत्काळ माहिती मिळते. जागेचा सर्व्हे नंबर बरोबर आहे की नाही याची देखील पडताळणी करता येते. जमीनमालक, रियल इस्टेट उद्योजकांना हे ऍप अतिशय उपयुक्त आहे.
दिशांक ऍपच्या वापरामुळे सर्वेअर आणि तहसीलदारांचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. राज्याच्या 30 जिह्यातील सुमारे सात लाख सर्व्हे नंबर व त्यांचा संबंधित तपशील दिशांक ऍपमध्ये आहे. नवीन मालमत्तेची खरेदी-विक्री, गावचा व्हिलेज ऍप यामध्ये समाविष्ट आहे. तुम्ही उभे असलेल्या जागेची संपूर्ण माहिती या ऍपमध्ये तात्काळ सर्व्हे नंबरसहित उपलब्ध होते. सदर सर्वे नंबरचा मालक कोण आहे याचीही तात्काळ माहिती मिळते. त्यामुळे जमीन खरेदी-विक्री करताना फसवणूक होण्याची शक्मयता आता धूसर होणार आहे.
एखादे भूखंड पाहण्यासाठी गेला असाल तर त्या ठिकाणी दिशांक ऍप ऑन केल्यानंतर तुम्हाला त्या जागेची संपूर्ण माहिती लगेच उपलब्ध होणार आहे. सदर जागा सरकारी असल्यास किंवा अतिक्रमण झाले असल्यास किंवा जागेतून कालवा गेला आहे का रस्ता आहे, किंवा कोणत्यातरी विशिष्ट उद्देशासाठी जागा राखीव ठेवली आहे का याची माहिती मिळते. दिशांक ऍप हे जरी जागेविषयी माहिती देत असले तरी ते अधिकृत नाही. दिशांक ऍपमध्ये मिळणारी माहिती कायदेशीर दाखला नव्हे. हे केवळ माहिती देण्यासाठी असलेले हे ऍप आहे. कायदेशीर कागदपत्रे मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयात जाणे आवश्यक आहे, असे सर्वे खात्याचे अधिकारी सांगतात.