सॅनफ्रान्सीस्को : आयफोनच्या निर्मितीत आघाडीवर असणाऱया ऍप्पलने आयफोन 13 फोनला कोणताही उशीर होणार नसल्याचे म्हटले आहे. नव्या आयफोन 13 च्या निर्मिती प्रक्रियेला लवकरच सुरूवात होणार असून याखेपेस वेळेवर उत्पादन पूर्ण केले जाणार असल्याचे स्पष्टीकरण ऍप्पलकडून करण्यात आले आहे. सदरच्या फोनचे उत्पादन पुढच्या वर्षी उन्हाळी हंगामात सुरू केले जाणार आहे. ऍपल ठरल्याप्रमाणे सप्टेंबरमध्ये फोन लाँच करणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. आयफोन 12 च्या उत्पादनावेळी कोरोना महामारीमुळे उशीर झाला होता. उत्पादन प्रक्रियेवर त्यावेळी परिणाम झाला होता. आयफोन 12 प्रमाणेच आयफोन 13 चे 4 प्रकार सादर केले जाणार आहेत.
Previous Articleनोकीया 5.4 बाजारात दाखल
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.