वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तसेच माजी कर्णधार सौरभ गांगुलीला डॉक्टरांनी आणखी काही दिवसांसाठी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान चालू महिन्याच्या अखेरीस होणाऱया आयसीसीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला बीसीसीआयचे सचिव जय शहा उपस्थित राहणार आहेत.
आयसीसीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीला केवळ विविध देशांच्या क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांना निमंत्रण दिले जाते तर आयसीसीच्या इतर बैठकांना मंडळाच्या सचिवांना उपस्थितीसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सौरभ गांगुलीची प्रकृती आता पूर्णपणे तंदुरूस्त झाली असली तरी त्याला काही दिवस विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे आयसीसीच्या आगामी बोर्ड बैठकीला जय शहा उपस्थित राहणार असल्याचे मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.