प्रतिनिधी / सातारा :
आशा स्वयंसेविकांनी ॲन्टीजन टेस्ट करण्याचा आदेश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रद्द केला. ही टेस्ट एएनएम, जीएनएम आणि आरोग्य अधिकारी यांना करणे बंधनकारक आहे. तरीही जिल्ह्यात आशांवर दबाव टाकून ॲन्टीजन टेस्ट करण्यात येत आहे. याला आशा सेविकांनी विरोध करून मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांना निवेदन दिले. मात्र, या निवेदनाची दखल अद्याप न घेतल्याचे आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (सीटु) च्या अध्यक्षा आंनदी अवघडे यांनी सांगितले.
फलटण तालुक्यातील एका ठिकाणी अधिकाऱ्यांनी आदेश धाब्यावर बसवून सर्व अधिकारी व आशा असे टेनिंग ठेवले. या टेनिंगला अधिकारी यायला तयार नाहीत, काम करायला तयार नाहीत. आशा नसतील तर टेनिंग पण होत नाही. गतवर्षीपासून मास्क, सॅनिटायझर वेळेवर न देवून आशाकडून कामे करून घेण्यात आली. याच पार्श्वभूमीवर ॲन्टीजन टेस्ट न करण्याचे आदेश असताना आरोग्य अधिकाऱ्यांकडून पिळवणूक सूरू आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनीही ॲन्टीजन टेस्ट एएनएम, जीएनएम, आरोग्य अधिकारी यांनी करावी आणि यात आशा स्वयंसेविकांची साथ घ्यावी, असा आदेश काढला आहे. आशांनी टेस्ट करावी असा उल्लेख नाही. गौडा यांच्या या पत्रानुसार ट्रेनिंग सुरू झाली. या टेनिंगला विरोध करत आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या वतीने विरोध करण्यात येत आहे.