प्रतिनिधी / बेळगाव
आशा कार्यकर्त्या व अंगणवाडी कर्मचाऱयांवर कोरोना काळात अधिक काम असून देखील सीएनए सर्व्हे करण्याचे काम देण्यात येत असून हे काम आम्ही करणार नाही, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य अंगणवाडी नोकर संघातर्फे जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले.
अंगणवाडी व आशा कर्मचाऱयांना बीएलओ व कोरोनाची कामे करावी लागत आहेत.त्यातच घरोघरी जाऊन सीएनए सर्व्हे काम करण्यास सांगण्यात येत आहे. याला आमचा विरोध आहे. त्यामुळे सीएनए सर्व्हे आम्ही करणार नाही, अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्षा मंदा नेवगी, संध्या कुलकर्णी, मीनाक्षी धपडे, वंदना चव्हाण, प्रियांका कांबळे, कृष्णा तोपिनकट्टी आदी महिला उपस्थित होत्या.