आषाढी एकादशीला वेगवेगळय़ा मंदिर आणि प्रेक्षागफहांमध्ये विठ्ठल-रखुमाईविषयीची भक्तिगीते, अभंग आणि गाणी ऐकण्याची संधी महाराष्ट्रातल्या वेगवेगळय़ा भागांमधल्या रसिकांना मिळते. परंतु, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एवढय़ा मोठय़ा प्रमाणात जमावबंदी असल्याने अशा कॉन्सर्ट्स आणि कार्यक्रमांना रसिक मुकणार आहेत. म्हणूनच सुरेल गळय़ाची गायिका सावनी रविंद्रने रसिकांसाठी एक तोडगा काढला आहे. सावनी यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन लाईव्ह कॉन्सर्ट केला. आषाढी एकादशी निमित्ताने ‘मन जाय पंढरीसी’ या ऑनलाईन लाईव्ह इन कॉन्सर्टद्वारे घर बसल्या सहकुटुंब विठ्ठल भक्तीने ओथंबून जाणाऱया अजरामर भक्तिगीतांची अनुभूती घेता येणार आहे.
आषाढी एकादशी 1 जुलैला आहे. परंतु, वर्क फ्रॉम होम करणाऱया देशातल्या आणि विदेशातल्या रसिकांना बुधवारी दोन तासांची कॉन्सर्ट अनुभवायला आपल्या कामामुळे कदाचित शक्य होणार नाही. म्हणूनच शनिवारी 27 जूनला हे कॉन्सर्ट अगदी नाममात्र शुल्कासह ठेवण्यात आले होते. सावनी रविंद्र म्हणते, सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कुठलेच कार्यक्रम गेले दोन तीन महिने होऊ शकलेले नाही आहेत. असे असले तरीही, तंत्रज्ञानामुळे या लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाद्वारे अनेक कलाकार आपल्या चाहत्यांसोबत कनेक्टेड राहिले आहेत. पण संपूर्ण कार्यक्रम पाहण्याची संधी रसिकांना मिळाली नाही आहे. अजूनही प्रेक्षागफहात कार्यक्रम जरी आम्ही करू शकत नसलो तरीही आम्ही कलाकार एकत्र जमून ऑनलाईन कॉन्सर्ट करू शकतो. म्हणूनच, आषाढी एकादशीचे निमित्त साधून ही पहिली वहिली ऑनलाईन लाईव्ह इन कॉन्सर्ट करायचे ठरवले. सावनी पुढे सांगते, “यंदा महाराष्ट्रातील अनेक भक्त वारीतही सहभागी होऊ शकले नाहीत. पंढरपूरला दरवर्षी लोटणारा भक्तीचा महासागरही महाराष्ट्राला अनुभवता आला नाही. कलाकार म्हणून आम्हीही हे सारं खूप मिस करतोय. त्यामुळे पांडुरंगा चरणी व्हर्च्युअली अशा पद्धतीने सेवा रूजू करण्याचा हा प्रयत्न आहे.