जवाहरनगरातील गोडावूनवर छापा, शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी
प्रतिनिधी / इचलकरंजी
येथील जवाहरनगरातील सुनिल महादेव शिरगावे याच्या राहत्या घराबरोबर त्याने राजराजेश्वरीनगरामध्ये भाड्याने घेतलेल्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. या दोन ठिकाणाहून १लाख ५१ हजार ६०९ रुपये किंमतीचा विविध कंपनीचा पानमसाला, सुगंधी तंबाखू जप्त केला. ही काखाई शिवाजीनगर पोलिसांनी केली.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना जवाहरनगरामधील सुनिल शिरगावे (वय ३२) याने राहत्या घरामध्ये अवैधपणे पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूचा साठा केला असल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्यावरून पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मगर यांच्या पथकाला त्याच्या राहत्या घरावर छापा टाकून पानमसाला, सुगंधी तंबाखू जप्त करण्याबाबतचा आदेश दिला. त्यावरून या पोलीस पथकाने त्याच्या राहत्या घरावर छापा टाकला. यावेळी त्याच्या घरातून हजारो रुपयांचा पानमसाला व सुगंधीत तंबाखू जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत राजराजेश्वरीनगरात भाड्याने घेतलेल्या घरामध्ये पानमसाला व सुगंधी तंबाखूचा साठा केल्याची माहिती समोर आली. त्यावरुन पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून, तेथूनही हजारो रुपयांचा पानमसाला, सुगंधी तंबाखूचा साठा जप्त केला. या दोन ठिकाणाहून पोलिसांनी १ लाख ५९ हजार ६०० रुपये किंमतीचा मुसाफिर आरएमडी, विमल या कंपनीचा पानमसाला आणि सुगंधी तंबाबू जप्त केला.